Tuesday, December 19, 2023

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,

लोकसभेपूर्वी होणार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने मागविली पात्र अधिकाऱ्यांची माहिती


अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात येणार आहेत. हे अधिकारी सध्या कोणत्या पदावर कार्यालयात आणि गट पाच वर्षांत कोठे कोठे काम केले आहे. अधिक माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात बदल्या होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्यानंतर

सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणाऱ्या या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि नाहीत तहसीलदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. लोकसभेसाठी उपजिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तालुका तहसीलदार यांना त्यांचे सहायक म्हणून काम करावे लागते अधिकारी जिल्ह्याचा रहिवासी असल्यास स्थानिक राजकीय नेते मंडळींची त्यांची जवळीक असते त्यामुळे निवडणूक कामात पारदर्शकपणा येणार नाही अशी निवडणूक आयोगाला वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.


Labels: , , ,

संत्रा उत्पादकांसाठी ठोस धोरण राबवावे अॅड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी, सरकारवर ताशेरे



अमरावती : विदर्भातील शेतकरी दरवर्षी सुमारे १२ ते १५ लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पन्न घेत असतात. मात्र, या संत्र्याला निर्यात धोरण राबविण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. निर्यातीसाठी असलेल्या विशिष्ट प्रोटोकॉलमध्ये केंद्र सरकारने संत्र्याची नोंद केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या देशात संत्रा पाठवायचा, याची माहिती मिळाली नाही. परिणामी राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन परदेशात पाठवता येत नाही. राज्यात पाच खासगी संत्रा निर्यात केंद्र आहेत, मात्र एकही सरकारी निर्यात केंद्र नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत केला.

संत्रा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात विदर्भातील असून, लाखो मे. टन संत्रा उत्पादन होते. मात्र, यापैकी अत्यंत कमी प्रमाणात संत्र्याची निर्यात परदेशात केली जाते. केवळ बांगलादेशातच संत्र्याची निर्यात केली जात असून, अन्य देशांमध्ये संत्र्याची मागणी आहे का? किंवा कोणत्या पद्धतीचा संत्रा अन्य देशांमध्ये खाल्ला जातो, याबाबतची कोणतीही माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नाही. ही माहिती प्राप्त होण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा किंवा केंद्र सरकारच्या आयसीसीआर यांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. विशिष्ट प्रोटोकॉल नोंद करताना संत्रा या पिकाची नोंद केली गेली नसल्याने ही माहिती या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे ठाकूर म्हणाल्या. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी अपेडा आणि आयसीसीआर या संस्थांमध्ये संत्रा निर्यातीबाबत सामंजस्य करार झाला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही. शेतकऱ्यांना निर्यातक्षम संत्रा उत्पादन करण्यासाठी सरकारने निर्यात केंद्र उभारावे, अशी मागणी अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली.


Labels: , , ,

Sunday, November 26, 2023

ग्रामसभेद्वारे होणार मतदार यादीची दुरुस्ती



अमरावती : जिल्हा प्रशासनाद्वारा ९ डिसेंबरपर्यंत दर शनिवारी व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. याचदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन होईल व याद्वारे आवश्यक दुरुस्ती करून अचूक मतदार यादी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादीत १८ वर्षांवरील नागरिकांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये कुणीही वंचित राहायला नको. याशिवाय स्थलांतरित व अन्यत्र रहिवासी नागरिकांची नावे वगळणे महत्त्वाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान त्यांना मतदार, मृत, स्थलांतरित नागरिकांची माहिती देऊन सहकार्य करावे. एकदा उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे कटियार म्हणाले.शाळा, महाविद्यालयांत कॅम्प सुरू असून, १८ वर्षांचे झालेले व होत असलेल्या मतदारांच्या नावनोंदणीचा व्यापक कार्यक्रम सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, रणजित भोसले, अनिल भटकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख उपस्थित होते.


  मतदार यादीचे शुद्धीकरण, आठ हजार मतदार कमी

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये २५,००,५८० मतदार होते व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २३,९२,५३५ मतदार संख्या आहे. या १० महिन्यांत तब्बल ८०४५ मतदार कमी झाले. बीएल- ओंद्वारा घरोघरी भेटी देण्यात आल्या व याद्वारा मृत, स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. यातून मतदार संख्या कमी झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.



Labels: , ,

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान



 अमरावती : काँग्रेस आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहेत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा देऊन संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. त्या भूमिकेवर ठाम राहत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या आ.अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. २०१४ पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर देशाचे संविधान हे एकच सशक्त उत्तर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला, तर तो नेहमीच प्रगतिपथावर राहील. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशात शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आ. ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते, याचा गाढ विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान जिल्ह्यात राबवणार असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Labels: , ,

ज्याला टिपायचे त्याला योग्यवेळी टिपतो; देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

 

मुंबई :- उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणुन ते सर्व गोष्टी एका फोटोग्राफरच्या नजरेतून बघत असतात. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या सामान्य दृष्टीकोणातून बघत असतो. पण शेवटी ते काही गोष्टी कॅमेऱ्यातून टिपून घेतात. मात्र मी सामान्य असल्याने योग्य टप्प्यात आल्यानंतर काय काय टिपायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला टिपायचे आहे त्याला मी योग्यवेळी टिपतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पांडा यांच्या वाइल्ड लाइफ फोटोंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस  माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले डॉ. रमाकांत पांडा यांची हार्ट सर्जन म्हणून ओळख आहे. परंतु तेवढेच ते सिद्धहस्त चित्रकार देखील आहेत. विशेषतः वाइल्ड लाइफमध्ये त्यांनी सुंदर फोटो टिपले आहेत. आज ती सगळी चित्र बघायला मिळाली. ही प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असे वाटते की, अतिशय सुंदर आपल्या निसर्गाचं वैविध्य त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपले आहे. निसर्गातील प्राणी त्यांनी टिपून जनतेच्या नजरेसमोर आणले आहे. हे सर्व करत असताना त्यांना जो काही मोबदला मिळतो ते दान करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी चित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जंगलाना वाचवले पाहीजे असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जंगलाना वाचवले पाहिजे यामध्ये माझे काही दुमत नाही. पण २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांत फॉरेस्ट कव्हरेजमध्ये वाढ केली असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

Labels: , ,

पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर टीका

 

मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Labels: , , ,

DELHI | तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे? : बिल गेट्स

नवी दिल्ली : माणसांच्या कामांचे तास किती असावेत? यावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तीन दिवसांचा आठवडा असला तरीही ठीक आहे. तसेच एआयबद्दलही त्यांनी भाष्य केले. AI मुळे तुमची नोकरी जाईल असे नाही मात्र यामुळे गोष्टी बदलतील इतके नक्की असे ही गेट्स यांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेचे विनोदी कलाकार आणि लेखक ट्रेव्हर नोह यांच्या पॉडकास्ट 'व्हॉट नाऊ'मध्ये बोलताना त्यांनी यावर  भाष्य केले. 
 तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे?
 बिल गेट्स म्हणाले,'' तीन दिवसांचा आठवडा असेल तरीही काही हरकत नाही.नोकऱ्यांमध्ये AI सारखे कृत्रिम तंत्रज्ञान येत आहे त्याविषयी काय सांगाल? असे  विचारले असता बिल गेट्स म्हणाले एक दिवस असाही येऊ शकतो की खूप मेहनत करावी लागणार नाही. आपल्या जगतात अशी एक वेळ येऊ शकते की आठवड्यातले तीन दिवसच काम केले तरीही चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी ७० तास काम केले पाहिजे असे  म्हटले होते. त्यानंतर आता बिल गेट्स यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.
 एक असेही जग असू शकते जिथे मशीन द्वारे जेवण तयार केले जाईल, जीवनावश्यक वस्तू तयार केला जातील आणि लोकांना आठवड्यात पाच दिवसांऐवजी फक्त तीन दिवस काम करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बिल गेट्स म्हणाले की, याचा प्रभाव नक्कीच मोठा पडणार आहे. मात्र माणसांचे काम AI संपवणार नाही. कामाच्या पद्धतींमध्ये बदल किंवा ज्याला फरक म्हणता येतील असे होतील, असे ही बिल गेट्स म्हणाले.
 लोकांना कमी कालावधीसाठी काम करु देण्यास हरकत नसलेले बिल गेट्स हे एकमेव व्यावसायिक नाहीत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही साडेतीन दिवसांचा आठवडा आणि बाकी सुट्ट्या असतील असे एक वक्तव्य केले होते.इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले होते. 
 पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले होती की, भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिले होते. तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला होता. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा एकदा नेटिझन्सना आठवण झाली.

Labels: , ,

Friday, November 24, 2023

BHATKULI | कृषी कार्यालय भातकुलीवर नितीन कदम यांची शेकडो शेतकऱ्यांसह धडक मोहीम


कृषीकार्यालय भातकुलीवर नितीन कदम यांची शेकडो शेतकऱ्यांसह धडक मोहीम
शेतकऱ्यांचा पिकविमा प्रश्न पेटला

स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाला विवीध नैसर्गिक - अनैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. विवीध माध्यमातून ते आपल्या निदर्शनास येते.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.पंचनामे झाल्यानंतरही नुकसाभरपाईची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी असताना दरम्यान शासनाने व पिकविमा कंपन्यांनी नुकताच पीकविमा रक्कम जाहीर केली. यावेळी नुकसाभरपाईची रक्कम ऐकताच शेतकरी अवाक झाले. या अग्रिम रकमेत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे आढळून आले. अमरावती जिल्ह्यासाठी केवळ ८ लक्ष रुपयांची रक्कम जाहीर करण्याचे परिपत्रक जाहीर झाले. प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही केवळ ७८ रुपये इतकी असुन शेतकरी वर्गात खळबळ उडाली.*
*संबधीत बाब समाजसेवी नितीन कदम यांच्या निदर्शनास येताच शेकडो शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी कार्यालयावर धडक मोहीम राबवत सर्वांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यासोबत कश्या प्रकारे अन्यायकारक भूमिका शासन घेत आहे ? याबद्दल जाब विचारत पिकविमा रक्कम वाढवून देण्याचे निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले.*
*शासनाने मंजूर केलेल्या १७०० कोटी रुपयांचा अग्रिम पिकविमा हा जाहीर केला. त्या पिकविमा रकमेमध्ये अमरावती जिल्हाच्या नावे फक्त ८ लक्ष रुपये देण्यात आली. त्या ८ लक्ष रकमेमध्ये शेतकऱ्यांची संख्या १०२६५ एवढी असून असुन म्हणजे प्रत्येकी ७८ रुपये येत आहे. सदर पिकविम्याची रक्कम अमरावती जिल्ह्याकरिता जाहीर करत शासनाने स्थानिक शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केले.* *यामध्ये सुधारणा करून शासनाचे आश्वासन केलेली २५ % रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा यासंदर्भातील निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांसह देण्यात आले.*
*यावेळी स्वप्निल मालधुरे, आकाश पाटील,अभिषेक सवाई, सागर पंचबुद्धे, विनोद पतलीया, प्रफुल्ल महल्ले, दिनू ठाकरे, सोपान भटकर, आकाश बांबर, सागर बारब्दे, मोहन भातकुलकर, परेश मोहोळ, आनंद मोहोड, सचीन देशमुख, राहुल वानखडे, बाबूराव वानखडे, धीरज देशमुख, जयंत पवार, गजानन लेंडे, शंकर बरडे, बंशिभाऊ लाठी, गजानन सवाई, किशोर सरोदे, अर्पण भजभुजे, आकाश मानकर, गोपाल रौराडे, संदीप कोलटेके, भोजराज कोलटेके, प्रदीप मोहोड, गोलू वाघ, श्रीकांत सवाई, संजय सवाई, अशोक झाडे, भुवन दहिकर, सूरज पवार, आनंद ठाकरे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

Labels: , ,

Thursday, November 23, 2023

Amravati | अमरावती मध्ये रुजू न झालेल्या पोलिस उपायुक्तांची पुण्यात बदली



 अमरावती : वर्षभरापूर्वी अमरावती शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून बदली झालेले मात्र वर्षभरानंतरही येथे रूजू न झालेल्या संभाजी कदम यांची पुणे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. ते येथे रूजूच झाले नसताना त्यांची येथून बदली कशी, असा प्रश्न खाकीत विचारला जात आहे. कदम यांच्या सुधारित बदलीचा आदेश २० नोव्हेंबर रोजी काढण्यात आला हे विशेष.राज्याच्या गृह विभागाने गतवर्षी ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. यामध्ये १०९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश होता. यात पुणे स्थित गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक सेवा पोलिस अधीक्षक संभाजी सुदाम कदम व पुणे शहर परिमंडळ-२ चे उपायुक्त असलेले सागर नेताजी पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांची अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली होती. त्यातील सागर पाटील हे गतवर्षीच आदेशाप्रमाणे अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून रूजू झाले. त्यांना परिमंडळ एकची जबाबदारी देखील देण्यात आली. मात्र, संभाजी कदम पुण्याहून अमरावती शहर आयुक्तालयात रूजूच झाले नाहीत. ते रूजू होतील, म्हणून अमरावती आयुक्तालयातून बदली झालेल्या उपायुक्त विक्रम साळी यांना येथून पदमुक्त करण्यात आले नाही. संभाजी कदम यांच्या रूजू होण्यावर विक्रम साळी यांना तब्बल एक वर्ष अधिकचे काढावे लागले. मात्र, कदम हे बदली आदेशाच्या वर्षभरानंतर ही येथे रूजू झाले नाहीत. आता आश्चर्यकारकरीत्या त्यांची पोलिस उपायुक्त पुणे शहर अशी बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी ते आदेश निघालेत. विशेष म्हणजे ७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार ते अमरावती शहर पोलिस उपायुक्त असल्याचा संदर्भ देखील २० नोव्हेंबरच्या आदेशात नमूद आहे. त्यामुळे कदम हे आयुक्तालयात रुजू झाले नाहीत, हे गृहविभागाच्या लेखी नसावे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता गणेश शिंदे हे अमरावतीचे नवे पोलिस उपायुक्त असतील. मात्र, ते अद्याप रूजू झालेले नाहीत.


हनमंत गायकवाड केव्हा येणार?

१३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार, अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाला तीन नवे सहायक पोलीस आयुक्त्त मिळाले. मात्र, शिवाजी बचाटे व कैलास पुंडकर हे दोघेच अधिकारी शहर आयुक्तालयात रुजू झाले. मात्र, आदेशाच्या ४० दिवसानंतर ही हनमंत गायकवाड मात्र एसीपी म्हणून रूजू झालेले नाहीत. त्यापूर्वी सुधीर पाटील नामक अधिकाऱ्यांची देखील एसीपी अमरावती म्हणून बदली झाली होती. मात्र ते देखील रुजू झाले नाहीत

Labels: , ,

Thursday, November 16, 2023

Amravati | जिल्ह्यात लागणार ६ लाख १९ हजार स्मार्ट वीज मीटर

 

smart meater

वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार असून लवकरच जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने महावितरणकडून सर्वेक्षण करण्यात येत असून जिल्ह्यात जवळपास ६ लाख १९ हजार स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.

एकीकडे स्मार्ट मीटरला विरोध असताना दुसरीकडे महावितरणने मात्र स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यावर ग्राहकांना मोबाइल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे.


आधी पैसे भरा मगच वीज वापरा

सध्या ग्राहकांना विजेच्या वापरानुसार बिल आकारले जाते. परंतु स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये ग्राहकांना आधीरिचार्ज करावा लागणार आहे. आणि तेवढ्याच रकमेची वीज त्यांना वापरता येणार आहे, भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील.

जुन्या मीटरचे काय होणार?

लाख स्मार्ट प्रीपेड मीटर लागतिल. त्याअनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन महिन्यांमध्ये नवे मीटर लावण्यास सुरुवात होईल.स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाल्यानंतर घरांमध्ये लागलेल्या जुन्या मीटरचे काय होणार असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. परंतु या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.


Labels: , ,

Bhatkuli | भातकुलीच्या राम मंदिराला २० लाखांच्या निधीचे पत्र

अमरावती: भातकुली येथील प्राचीन राम मंदिराला दिवाळीच्या दिवशी आग लागली होती. मात्र नागरिकाच्या सतर्कतेमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आग विझविली. श्रीराम मंदिर हे सुखरूप आहे. परंतु मंदिरातील काही भागाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती आमदार रवी राणा यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी तथा नगरपंचायत भातकुली सीओ यांच्याशी चर्चा करून बुधवारी २० लाखांचा निधीचे पत्र मंदिर विश्वस्तांना प्रत्यक्ष दिले.



आमदार राणांनी श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण केले आणि समस्त भक्तगण, भातकुली येथील नागरिकांना व कार्यकर्त्यांना समक्ष निधीचे पत्र आमदार रवी राणा यांनी दिले. यावेळी  अध्यक्ष योगिता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडळकर, दिनेश मंत्री, दिलीप मंत्री, गिरीश कासट, सत्तू मंत्री, ओमप्रकाश राठी, शंकर डोंगरे, डॉ सोळंके, सद्दाम खान, गोविंद बोरा, विजय बोरा, गजानन भोपसे, रामेश्वर लढ्ढा, नरेश बाहेती, पोलिस निरीक्षक वांगे, उपस्थित होते.


Labels: , ,

Tuesday, November 14, 2023

BHATKULI | भातकूली नगर पंचायतची अग्निशामक दलाची गाडी बनली शोभेची वस्तू....


भातकुलीअमरावती जिल्ह्यातील भातकुली शहरातील नगर पंचायत ची अग्निशामक दलाची गाडी धुळखात ग्रामीण रुग्णालय मधे भरती आहे.4/5 वर्षापूर्वी नगर पंचायत भातकुली ला अग्निशामक दलाची गाडी मिळाली.त्यामुळे शहरात लागणाऱ्या आगीवर नियत्रंन राहणार अशी चर्चा शहरातील लोकांमधे होती.त्यामुळे सर्वाँना आनंदच झाला होता शहर आणि आजू बाजूच्या खेड्याच्या परिसरात आग लागल्यास तातडीने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहचेल अशी आशा होती.परतू ती आशा मात्र धुळीस मिळाली आहे. लाखो रुपयांची अग्निशामक दलाची गाडी ग्रामीण रुग्णालय मधे भरती केलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.कारण अग्निशामक दलाची गाडी चालवण्यासाठी ना चालक नाही ना कर्मचारी नाही आणि विशेष म्हणजे आग विझवण्यासाठी पाणीच नाही.अशी लाखो रुपयांची अग्निशामक दलाची नगर पंचायत ची गाडी धुळखात ग्रामीण रुग्णालय परिसरात पडलेली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी शहरात श्री राम मंदिरात पहाटे ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली हि आग फटाक्यामुळे लागल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.रात्री गस्तीवर असणारे पोलिस कर्मचारी हवालदार रहीम शेख यांना ही आग दिसली त्यांनी क्षनाचाही विलंब न लावता अग्निशामक दलाची गाडी अमरावती वरून अवघ्या 20 मिनिटात बोलावली.तसेच लोकांना जागे करून सर्तक केले आग विझवण्यात अमरावती अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करीत आहे आग विझवण्यासाठी तब्बल तीन तासाची कसरत अग्निशमन दलाच्या पथकाला करावे लागलेत या आगीमुळे मंदिराचे ७ ते ८ लाखाचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दल व रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिस कर्मचारी पोलीस हवालदार रहीम शेख, सज्जाद खान, गौतम ढोणे, चालक सन्नी ,जगदीश शीरपुरे यांच्या सर्तक मुळे जीवीत हानी टळली.अन्यथा भातकुली शहरामध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली असती. नप भातकुली ची अग्निशामक दलाच्या गाडी ची वाट पाहत बसलो असतो तर कदाचित आर्थिक हानी आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असती.शहरामध्ये जनतेकडून टॅक्स वसूल केल्या जाते आणि त्या टॅक्स वसूल मधे सर्वात जास्त आकारमान हा अग्निशामक वर लावण्यात येत असते.जर नप कार्यालय भातकुली अग्निशामक सुविधा पुरवू शकत नाही तर हे टॅक्स कश्यासाठी वसूल करतात. जर अग्निशामक सेवा पुरविण्यात अपयशी ठरत असेल तर अग्निशामक कर जनतेकडून वसूल करू नये असा सवाल नगरसेवक सतीश आठवले यांनी केला आहे.

नगरपंचायत भातकुली अग्निशामक दलाची गाडी केवळ त्या गाडीवर चालक,पाणी,कर्मचारी नसल्याने शोभेची वस्तू बनली आहे ती गाडी ग्रामीण रुग्णालय मधे भरती केलेली आहे.जनतेकडून जो जबरदस्तीने अग्निशामक कर वसूल केल्या जातो तो ताबडतोब बंद करावा आणि पोलीस हवालदार रहीम शेख व ईतर कर्मचारी तसेच अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांचे मी आभार मानतो.त्यांच्या सर्तकतेमुळे आग आटोक्यात आली अन्यथा जीवितहनी झाली असती.

सतिश शंकरराव आठवले
नगरसेवक भातकुली

Labels: , ,

Thursday, November 9, 2023

EKNATH SHINDE |मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द

 मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द


  मुंबई, दि.8 : ऋद्धिपूर (जि.) अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठी भाषा विद्यापीठ स्थापने बाबतचा अहवाल सादर केला.

    मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे,यांनी हा अहवाल सुपूर्द केला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रिमंडळातील सदस्य,मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.

         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे.

         मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगार क्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.


Labels: , ,

AYODHYA | श्रीराम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट की ओर से मंदिर की रात की तस्वीरें

अयोध्या में श्रीराम जन्मभूमि मंदिर का निर्माण कार्य लगभग पूरा ही होने वाला है. मंदिर में दिन-रात काम चल रहा है. श्रीराम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट की ओर से मंदिर की रात की तस्वीरें जारी की गई हैं. आप भी देखिए ये अद्भुत तस्वीरें



Labels: , ,

Saturday, November 4, 2023

Ahmadnagar News : एवढी मोठी लाच कुणीच मागितली नसेल, रक्कम ऐकून चक्रावून जाल, महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. छापा टाकून लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.




अहमदनगर | 4 नोव्हेंबर 2023 : लाच मागणं (bribe) हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही लोकांची काम करून देण्यासाठी अनेक जण लाच मागत असतात.अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागून (bribe case) स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच दणका बसला आहे. अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने ही कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्याने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.


अशी केली कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या इसमाला औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्याविरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.


यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये दाखल झाले. नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ छापा मारला आणि लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Labels: , , ,

MELGHAT CRIME | मेळघाटच्या सिमेवर 12 पिस्तुलसह एकास अटक....

 


धारणी,-  मध्य प्रदेशात निवडणुकीचे वारे जोमात सुरू होताच अवैध हत्यारांचा व्यवसाय पण सुरू झालेला आहे. धारणीच्या सिमेवरील खकणार पोलिस ठाणे (मध्य प्रदेश) जवळच्या पांगरी फाट्यावर पोलिसांनी 12 पिस्तुलींसह आरोपीस पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व पिस्तुल पाचोरी मेड आहे.

धारणी तालुक्याच्या सिमेपासून अवघ्या 20 कि. मी. अंतरावरील मध्य प्रदेशच्या पांगरी फाट्यावर आरोपी अनिल रामदिन यादव (44, रा. लखीराम पूर्वा, उ. प्र.) याला खकणारचे ठाणेदार विनय आर्य यांनी अडवून झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 10 पाचोरी मेड पिस्तुली होत्या. आरोपीच्या सांगण्याप्रमाणे सर्व पिस्तुली पाचोरी येथील दारासिंग सिकलीगरच्या घरातून विकत आणलेल्या होत्या. पोलिस पथकाने दारासिंगच्या घराची झडती घेतली. मागच्या बाजुला आणखी दोन हस्तनिर्मित पिस्तुली जप्त करण्यात आल्या मात्र दारासिंग पळून गेला.

Labels: , , ,

Wednesday, November 1, 2023

AMRAVATI | मोर्शी तालुक्यातील काटपुर( ममदापुर) येथे वेंकटचलपती श्रीनिवास भगवान बालाजीची आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आरती......


भगवान व्यंकटेश यांना गोविंदा, श्रीनिवास, वेंकट आदी नावांनी ओळखल्या जाते. आंध्रप्रदेश येथील तिरुमला पर्वत रांगेत असलेल्या भगवान वेंकटेश्वर हे विष्णूचा अवतार असून तिरुपती मंदिराची प्रमुख देवता आहे असे मानले जाते.यासोबतच असे मानले जाते की देवता स्वयंभू ( स्वतः प्रकट आहे).या देवतेकडे त्रिमूर्तीची शक्ती आहे. ब्रम्हा, विष्णू आणि शिव काही पंथाचा असा विश्वास आहे की वेंकटेश्वराकडे शक्ती आणि स्कंदची शक्ती आहे. इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अनेकांनी श्री व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव घेतला आहे. तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते. अर्थातच पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान.तिरु म्हणजे लक्ष्मी,लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार आहे.भगवान वेंकटेश्वर साक्षात मंदिरातील गर्भगृहात विराजमान आहेत. आपल्या भक्तांच्या मनापासून इच्छा पूर्ण करणारा सर्वात शक्तिशाली परमेश्वर म्हणून त्याची मान्यता आहे.


भगवान वेंकटेश्वर हे वेंकटचलपती श्रीनिवास म्हणूनही ओळखले जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील काटपुर( ममदापुर) स्थित श्री बालाजी संस्थान येथे ब्रम्होत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान देवालय परिसरात विविध प्रकारच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तिर्थस्थापना, भजनमाला,शयन आरती व प्रसाद,श्री व्यंकटेश स्तोत्र पठण, श्री व्यंकटेश प्रभू-श्रीदेवी-भुदेवीसह गावातून पालखी यात्रा,अभिषेक, ललित कीर्तन आदींसह विविध प्रकारच्या कार्यक्रमात भाविकभक्तांच्या वतीने उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला जात आहे. मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी श्री बालाजी संस्थान येथे भेट दिली. यादरम्यान आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी श्री व्यंकटेश बालाजी प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करीत भगवान वेंकटेश्वर अर्थातच वेंकटचलपती बालाजी भगवान ,देवी महालक्ष्मी आणि देवी पद्मावती यांचे कृपाशीर्वाद घेतले.तदनंतर आ. सौ. सुलभाताई खोडके व यांच्या हस्ते भगवान बालाजी यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी श्री बालाजी संस्थानच्या विश्वस्थांनी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यादरम्यान भगवान बालाजी यांच्या आशीर्वादाने सर्वांचे संकल्प व मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान वेंकटेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होत आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी विश्वमांगल्याची प्रार्थना केली.याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके, यश खोडके,महेंद्र भुतडा,अजय दातेराव,श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष-सुभाषचंद्र राठी,सचिव-जुगलकिशोर भट्टड, विश्वस्त-साहेबराव धनसांडे,पुरुषोत्तम राठी आदींसह  बहुसंख्येने भावीकभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels: , ,

Rule Of Change | गॅस सिलेंडर महागला, आजपासून या सेवांमध्ये झाला बदल

Rule Of Change | नोव्हेंबर महिन्याची सुरुवातच या बदलांनी झाली आहे. त्यात गॅस सिलेंडर महाग झाला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसेल. जीएसटी, लॅपटॉप आयातीवरील शुल्कासंबंधी आणि इतर अनेक नियमांत बदल होत आहे. या महिन्यात बँकांना इतक्या सुट्या आहेत. त्यामुळे बँकेसंबंधीची कामे सुट्टी पाहूनच करा.


 नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच गॅस सिलेंडर दरवाढीने झाली. दिवाळीचा फराळ यामुळे वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल. आता दिवाळी तोंडावर आली आहे. त्यातील हे काही बदल ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदत ठेव योजनेच्या नियमात बदल केला आहे. श्रीमंत ग्राहकांना या बदलाचा फायदा होईल. बीएसईवरील देवाण-घेवाणीबद्दल पण बदल होत आहे. आर्थिक नियमातील या बदलाचा परिणाम दिसून येईल. सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडेल. त्यांना दिवाळीत अधिक खर्च करावा लागू शकतो.

गॅस सिलेंडरच्या भावात वाढ

सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईचा झटका लागला. आजपासून देशात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली. त्याचा परिणाम रेस्टॉरंट, हॉटेलपासून मिठाई, दिवाळीच्या फराळावर दिसून येईल. या शेव,चिवड्यासह इतर तळीव पदार्थ महाग होतील. बाहेरुन घरात येणाऱ्या खाद्यवस्तू महाग होतील.

शेअर बाजारात हा बदल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) आजपासून बदल दिसेल. 1 नोव्हेंबरपासून डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये देवाण-घेवाणीसाठी जादा शुल्क मोजावे लागेल. गेल्या 20 ऑक्टोबर रोजी याविषयीचा निर्णय घेतला होता. S&P BSE Sensex Option मध्ये हा बदल दिसून येईल. किरकोळ गुंतवणूकादारांवर या शुल्क वाढीचा परिणाम होईल.

बँकांना सुट्या

सणावारात बँकांना नोव्हेंबरमध्ये सुट्यांचा सुकाळ आहे. सुट्यांची पण एकप्रकारे दिवाळी आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर रविवार-शनिवारसह इतर दिवस मिळून 15 सुट्यांचा पाडाव आहे. त्यामुळे बँकेचे ऑफलाईन काही काम असेल तर या सुट्या पाहुनच करावीत.

GST नियमात पण बदल

100 कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय, व्यापार करणाऱ्या उद्योगांसाठी नियम बदलला आहे. त्यांना 1 नोव्हेंबर ते 30 दिवसांच्या आता ई-चलन पोर्टलवर जीएसटी चलना अपलोड करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (NIC) ही माहिती दिली. जीएसटी प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात याविषयीचा निर्णय घेतला होता.

केंद्र सरकारने 30 ऑक्टोबरपर्यंत HSN 8741 या कॅटेगिरीतील लॅपटॉप, टॅबलेट, पर्सनल कंम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयतीवर सवलत दिली होती. आज या निर्णयात केंद्र सरकार काय बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार याप्रकरणी भूमिका जाहीर करु शकते.

Labels: , , ,

Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंना निमंत्रण नाही !

 Mumbai News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आज आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रित करण्यात न आल्याने सराकारने ठाकरे गटाकडे दुर्लक्ष केले, असे बोलले जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्वसहमतीने आरक्षणावर सकारात्मक विचार करून तोडगा काढण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायंच का? मराठा आरक्षणाचे मार्ग देण्याचे मार्ग कोणकोणते आहेत? यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढण्याचा दृष्टीने यावर चर्चा होणार आहे.

Labels: , , ,