Thursday, November 16, 2023

Amravati | जिल्ह्यात लागणार ६ लाख १९ हजार स्मार्ट वीज मीटर

 

smart meater

वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार असून लवकरच जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने महावितरणकडून सर्वेक्षण करण्यात येत असून जिल्ह्यात जवळपास ६ लाख १९ हजार स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.

एकीकडे स्मार्ट मीटरला विरोध असताना दुसरीकडे महावितरणने मात्र स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविली आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यावर ग्राहकांना मोबाइल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे.


आधी पैसे भरा मगच वीज वापरा

सध्या ग्राहकांना विजेच्या वापरानुसार बिल आकारले जाते. परंतु स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये ग्राहकांना आधीरिचार्ज करावा लागणार आहे. आणि तेवढ्याच रकमेची वीज त्यांना वापरता येणार आहे, भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील.

जुन्या मीटरचे काय होणार?

लाख स्मार्ट प्रीपेड मीटर लागतिल. त्याअनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन महिन्यांमध्ये नवे मीटर लावण्यास सुरुवात होईल.स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाल्यानंतर घरांमध्ये लागलेल्या जुन्या मीटरचे काय होणार असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. परंतु या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.


Labels: , ,