Tuesday, October 31, 2023

anti corruption bureau news | भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 
अमरावती, दि. 31 : राज्यात दरवर्षी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर या जन्म दिवसानिमित्त एक आठवडा ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे करण्यात येते.  यंदाही दि. 30 ऑक्टोबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’  ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती कार्यालय येथे नुकतीच भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताह 2023 ची सुरूवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना यावेळी वाचून दाखविण्यात आला. 
    या कार्याक्रमास पोलीस अधिक्षक  मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर  यांच्यासह सर्व अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताह 2023 दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निमुर्लन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याव्दारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचार संबंधाने काहीही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क क्र. 0721-2553055/2664902 यावर टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा. अथवा कार्यालय पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक मिलींदकुमार बहाकर यांनी केले आहे. 

Lucky Colour For Vehicle As Per Your Zodiac Sign | या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही लाल रंगाची गाडी खरेदी करू नये, तुमच्या राशीसाठी हा रंग भाग्यशाली ठरणार

 ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार वाहन सुख विशेषत: शुक्र आणि शनीच्या कृपेवर अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात वाहन सुख तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्याच्यावर शनि आणि शुक्राची कृपा असते. असे म्हणतात की कुंडलीत शुक्र जेव्हा चांगल्या स्थितीत असतो तेव्हा वाहन सुख नक्कीच मिळते, मग ते वाहन स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीसाठी कोणत्या वाहनाचा रंग शुभ आहे.


मेष

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ आहे. याशिवाय या राशीच्या लोकांसाठी गोल्डन, सिल्वर, पिवळ्या किंवा केशरी रंगाची वाहनेही तितकीच फायदेशीर ठरतील. वाहनात हनुमानाची मूर्ती लावणे शुभ ठरेल

 

वृषभ

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या रंगाची वाहने खरेदी करणे शुभ असते. तर या राशीच्या लोकांनी लाल रंगाची वाहने वापरणे टाळावे. वाहनात शिवाची मूर्ती बसवल्यास शुभ होईल.


मिथुन

मिथुन राशीच्या जातकांनी क्रीम किंवा हिरव्या रंगाचे वाहन खरेदी करावे. हे त्यांच्यासाठी शुभ ठरेल. या लोकांनी आपल्या वाहनात गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे.

 

कर्क

ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांनी पांढर्‍या किंवा लाल रंगाचे वाहन खरेदी केले पाहिजे. या राशीच्या लोकांनी कारमध्ये हनुमानजींची मूर्ती स्थापित केल्यास त्यांच्या जीवनात शुभफळ कायम राहतात.


सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रे शेडमध्ये वाहन खरेदी करणे शुभ ठरतं. वाहनात गायत्री मंत्र लिहिणे शुभ ठरेल.

 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी पांढर्‍या किंवा निळ्या रंगाची वाहने शुभ ठरतात. या लोकांनी लाल रंगाचे वाहन घेणे टाळावे. गाडीत भगवान कृष्णाची स्थापना करावी.

 

तूळ

तूळ राशीच्या जातकांनी निळ्या रंगाचे वाहन खरेदी करावे. यापुढे एक लहानसं स्वस्तिक लावावे.

 

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी पांढर्‍या रंगाचे वाहन खरेदी करणे उत्तम ठरेल. हिरवे आणि काळे रंगाचे वाहन खरेदी करणे टाळावे. गाडीत शिवाचे चित्र किंवा मूर्ती लावावी.

 

धनू

लाल आणि सिल्वर शेड्सचे वाहन धनू राशीच्या जातकांसाठी फायद्याचे ठरतात. काळे आणि निळे शेड्सचे वाहन घेणे टाळावे. वाहनात हनुमान चालीसा ठेवावी.

 

मकर

या राशीच्या लोकांसाठी पांढरा, ग्रे किंवा स्लेटी शेड्सचे वाहन उत्तम ठरतात. लाल आणि निळ्या रंगाची वाहने टाळा. श्रीकृष्णाची मूर्ती वाहनात ठेवावी.

 

कुंभ

निळ्या, पांढऱ्या आणि राखाडी शेड्सची वाहने या राशीच्या लोकांना शुभ ठरतील. वाहनात शंकराची प्रतिष्ठापना करा.

 

मीन

मीन राशीच्या लोकांनी शक्यतो गोल्डन, पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाचे वाहन खरेदी करावे. तसेच वाहनात हनुमानजींचे चित्र ठेवावे.

Labels: , ,

MAHARASHTRA | देवेन्द्र फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; संजय राऊतांची मागणी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलं आहे. एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना, महाराष्ट्र इतका खदखदत असताना छत्तीसगडमध्ये प्रचार करत आहेत. छत्तीसगडचा प्रचार महत्त्वाचा आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था? दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. आता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी त्यांना मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होत


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वत:ला खूप जबाबदार आणि कर्तबगार समजतात. राज्यांची त्यांना खडा न् खडा माहिती आहे. राज्य इतकं पेटलेलं असताना ते राज्यात नाही. त्यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आहे. गृहमंत्री पदाची जबाबदारी असलेला नेता राज्य सोडून कसं जाऊ शकतो?, असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.


राज्य नुसतं पेटलेलं नाही तर लोकप्रतिनिधींची घरंही पेटवली जात आहेत. नेत्यांना गावबंदी केली आहे. लोकांना गावात येऊ दिलं जात नाही. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चिघळत चाललं आहे. आज ते पडले. मला दिल्लीत समजलं. आणि गृहमंत्री छत्तीसगडमध्ये भाषणं करत आहेत. राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. गावबंदी सुरूच राहील. गृहमंत्री ज्या पद्धतीने बेदरकारपणे वागत आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.


मंत्र्यांना गावात येऊ दिलं जात नाही. आमदारांची घरे जाळली जात आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ सुरू आहे. कुठे आहे कायद्याचं राज्य? कायद्याचं राज्य केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी आहे काय? खोटे खटले दाखल करणं हे कायद्याचं राज्य? हे काय सरकार आहे का? असा सवाल करतानाच सरकारच अस्तित्वात नाही. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे बेकायदेशीर सरकार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाका नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे. अशा त्रिकोणात हे राज्य सापडलं आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना फटकारलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मूळात राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं पाहिजे. ते या पदासाठीच अपात्र आहेत. ज्या पद्धतीने ते चालढकल करत आहेत, ज्या पद्धतीने ते सर्वोच्च न्यायालयाला फाट्यावर मारत आहेत, ज्या पद्धतीने ते संविधानाला मानत नाहीत, अशी व्यक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर असेल तर ती अपात्रच आहे. आधी त्यांना अपात्र केलं पाहिजे. मग इतर आमदारांना अपात्र केले पाहिजे, असे ते म्हणाले.

Labels: , ,

JALNA | १ नोव्हेंबरपासून आमचे आंदोलन झेपणार नाही; जरांगे पाटलांचा थेट इशारा

 जालना :- मागील ६ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत मनोज जरांगे यांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. मराठा समाजाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे हे पाण्याचा घोट घेण्यास तयार झाले आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनानंतर राज्य सरकारकडून जीआर यायला लागले आहेत, पण तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनानंतर मात्र त्यांना बैठकाही घेता येणार नाहीत, तर या आंदोलनाचे ६ टप्पे होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सरकारला थोडा अवधी द्या, असे आवाहन केले आहे असे मनोज जरांगे यांना विचारताच ते म्हणाले की, थोडा म्हणजे किती? मुख्यमंत्र्यांना तुम्हीच विचारा. किती अवधी द्यायचा? थोडा म्हणजे ४० वर्ष का? असा प्रश्न जरांगे पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. तसेच, त्यांनी आमचे शांततेचे आंदोलन पाहिले आहे. आता तर १ नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. तेव्हापासून तर सरकारला बैठका देखील घेण्यात येणार नाहीत, असा इशाराच जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्याकडून देण्यात आला 




आंदोलन भरकटत चालले आहे, जरांगेंनी याबाबत जरा विचार करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला उत्तर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे खूप खोडसाळ आहेत. ते काही तरी बोलले असतील म्हणूनच त्यांच्यासोबत असे घडले असेल. त्यांना मराठ्यांनी मोठे केले आहे. ते कधी सोसायटीत देखील निवडून येऊ शकत नाही. पण मराठ्यांनी त्यांना मोठे केले आणि ते मराठ्यांना ज्ञान शिकवत आहेत. पण तिथे जे काही घडले आहे ते मराठ्यांनी केलेले नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो पण सरकारने त्यांच्या वाचाळवीरांना आवरावे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही मराठा समाजाच्या मागणीबाबत आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना बोललात का? याचे आजपर्यंत आलेले नाही. याचा अर्थच असा होतो की केंद्र सरकारला तुम्ही काहीही सांगितले नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शिर्डीत आले होते तरीही त्यांच्याशी संवाद साधला नाही हा प्रश्न सांगितला नाही मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? क्युरेटिव्ह पिटिशन १३ ऑक्टोबरलाच दाखल झाली आहे. त्यानंतर १६ तारखेला आपण विचारले होते. पण पंतप्रधानांना काही माहीत असते तर पंतप्रधानांनी शिर्डीत उल्लेख केला असता. आमचे आंदोलन शांतेत सुरू आहे. मात्र हे शांततेचे युद्ध सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून देण्यात आलेला आहे

Labels: , ,

AMRAVATI | उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  95.50 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल

कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

 इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मी. पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या नगदी पिकांसाठी (उदा. ऊस, कापूस, केळी व फळबाग) पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

  लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिकेत पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणीपाळी कालावधीत वाढ होते.

 

रब्बी हंगाम 2023-24 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 5 डिसेंबर 2023  (22 दिवस) तर  कालवा बंद कालावधी 6 ते 12 डिसेंबर 2023 राहील. दि. 13 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी  2024 कालव्यात  (22 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते 10  जानेवारी 2024 कालवा बंद राहील. दि. 11 ते  दि. 27 जानेवारी 2024 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 28 जानेवारी ते दि.3 फेब्रुवारी 2024 कालवा बंद राहील.  दि. 4 ते  दि. 20 फेब्रुवारी 2024 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 21 ते दि. 27 फेब्रुवारी 2024  कालवा बंद राहील. दि. 28 फेब्रुवारी  ते 15 मार्च 2024 (16 दिवस) पाणी सोडण्यात येईल.  कालव्यात एकूण 94 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.  

Labels: , ,

AMRAVATI | पेंशन अदालत व कार्यशाळा 2 व 3 नोव्हेंबर रोजी

अमरावती, दि. 30 (जिमाका) : नागपूर हे विदर्भातील सर्व कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त पेंशनधारक व कौटुंबिक पेंशनधारकांना विविध माध्यमातून सोयी सुविधा पुरवित आहे. पेंशन प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करून पेंशनधारकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात आहरण व संवितरण अधिकारी व पेंशनधारकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, पेंशन अदालत व कार्यशाळा गुरूवार दि. 2 व शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर, 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.  संबंधितांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले आहे

Labels: , ,

AMRAVATI | निवृत्ती वेतन धारकांनी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावेत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : कोषागारामधून निवृत्तीवेतन स्वीकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या पेंशन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या निवृत्तीवेतनधारकांच्या ह्यात यादीवरच स्वाक्षरी करावी तसेच विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरावी. बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावे. निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ह्यात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2023 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. याबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे. 


Labels: , ,

Google Map : गुगल मॅपवर बदललं देशाचं नाव; सर्च केल्यावर पहा काय दिसतंय?

 AMRAVATI : 31 ऑक्टोबर 2023 | सरकारने देशाचं नाव ‘इंडिया’वरून ‘भारत’ करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून बरंच राजकारणसुद्धा झालं होतं. ‘इंडिया’ हे देशाचं इंग्रजी नाव बदलून अद्याप अधिकृतरित्या ‘भारत’ करण्यात आलं नाही. मात्र गुगल मॅपने या नव्या नावाचा आधीच स्वीकार केल्याचं पहायला मिळतंय. जर तुम्ही गुगल मॅपवरील सर्च बॉक्समध्ये ‘भारत’ असं टाइप केलात तर तुम्हा ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून तिरंगा झेंडा दिसून येईल. तुम्ही तुमच्या गुगल मॅपची भाषा हिंदी किंवा इंग्रजी ठेवली असली तरी त्याने काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही भारत असं हिंदी किंवा इंग्रजीत टाइप केलं तरी तुम्हाला गुगल रिझल्ट म्हणून ‘इंडिया’च दिसेल. याचाच अर्थ गुगल मॅपने इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे. 


गुगल मॅपवर सर्च करून पहा..

युजर्सना जर भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीत गुगल मॅपवर भारत किंवा इंडिया असं लिहून सर्च करू शकतात. या दोन्ही शब्दांचं एकच उत्तर गुगल मॅप देतंय. गुगल मॅपच्या हिंदी व्हर्जनवर जर तुम्ही भारत असं टाइप करत असाल, तर तुम्हाला भारताच्या नकाशासोबतच ‘भारत’ असं बोल्डमध्ये लिहिलेलं दिसून येईल. जर तुम्ही गुगल मॅपच्या इंग्रजी व्हर्जनमध्ये ‘Bharat’ असं टाइप करत असाल, तर तुम्हा सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासोबतच ‘India’ असं लिहिलेलं दिसून येईल. म्हणजेच गुगल मॅपने भारताला इंडिया म्हणून स्वीकारलं आहे. एकीकडे सरकारने देशाचं नाव बदलण्याचे संकेत दिले असतानाच आता गुगलनेही आपला होमवर्क सुरू केला आहे.


विशेष म्हणजे फक्त गुगल मॅप्सच नाही, तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही तुम्ही जर भारत किंवा इंडिया टाइप करत असाल, तर दोन्हींचं उत्तर एकच मिळेल. गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज यांसारख्या ॲप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिलं, तरी त्याचं उत्तर एकच मिळतंय. याबाबतीत अद्याप गुगलकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही

Labels: , ,

PARATWADA | अवैध सागवाना सह कटर मशीन साहित्य जप्त,परतवाडा वनविभागाची धडक कारवाई

परतवाडा : घाटलाडकी येथील एका घरातून वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा यांनी अवैध सागवानासह कटर मशीन व इतर साहित्य जप्त केले आहे. तर एकास चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांनी घाटलाडकी येथील त्या घराची झाडाझडती घेतली. त्या घरातून ही अवैध सागवान लाकूड, एक लाकडी दिवाण व फर्निचर आणि कटर मशीनसह सुतारकामाचे साहित्य ताब्यात घेतले. एकास चौकशी करिता ताब्यात घेतले. अमरावती प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांच्या नेतृत्वात शिरजगाव वनपाल व्ही. व्ही. कोवळे, दर्यापूर वनपाल एस. एस. हाते, यांचेसह वनरक्षक आणि वन कर्मचाऱ्यांनी व ब्राह्मणवाडा पोलिसांनी कारवाई केली. यापूर्वी देखील या भागात अवैध सागवान पकडण्यात आले होते. त्यामुळे वनविभागाने तिकडे नजर रोखली होती.




Labels: , ,

AMRAVATI | घरकुलांसाठी ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम

अमरावती: ग्रामपंचायतींची अनास्था, निधी वेळेवर न मिळणे, यादीतील घोळ यासह अनेक अडचणींमुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे. जिल्ह्यात १६ हजार घरकुले अपूर्ण असून, या घरकुले बनविण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. घरकुलाची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-२०२२ पर्यंत ९२ हजार ६३० घरकुलांचे टार्गेट दिले होते. लाभार्थ्यांना चार टप्प्यांत घरकुले बांधण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. घरकुलांसाठी ग्रामपंचायतींच्या अंतर्गत जागासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींकडून लाभार्थ्यांना जागाच उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने घरकुलांचे कामच सुरू झालेले नाही.


Labels: , ,

Monday, October 30, 2023

AMRAVATI | ICC CRICKET WORLD CUP 2023 क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा, हिशेब करताना बुकी झाला जेरबंद जितेश आडतियाला अटक : Mobil Laptop जप्त करण्यात आले

अमरावती : भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या वर्ल्ड कप मॅचवर स्थानिक महेशनगर येथे लक्षावधी रुपयांचा सट्टा खेळवला गेला. पोलिस आयुक्तांच्या सीआययू पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान तो गोरखधंदा उघड झाला. रविवारी रात्री महेशनगर येथे झालेल्या या कारवाईदरम्यान जितेश रमनिकलाल आडतिया (५०, महेश नगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, पाच मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील ही पहिली कारवाई ठरली आहे

जप्त करण्यात आलेले साहित्य.

CIU पथक पेट्रोलिंग करीत असतांना महेशनगर येथे जितेश आडतिया हा स्वतःच्या घरून भारत विरुद्ध इंग्लंड या वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोबाइल फोन व लिंकच्या सहाय्याने बेटिंग घेऊन सट्टा खेळवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे तेथे धाड टाकली असता तो मोबाइलमधील गुगल क्रोममधील ओएसटीआयएन ७७७ या अॅपवर ऑनलाईन बेटिंग घेत असल्याचे दिसून आले. गैरकायदेशीर सॉफ्टवेअर बनवून ते लोकांना खरे आहे असे भासवून तो क्रिकेट मॅचवर फोन तसेच लॅपटॉपच्या सहाय्याने बेटिंग व हिशेब करताना मिळून आला. तसेच त्याच्या मोबाइलमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेऊन सट्टा खेळविल्याच्या रेकॉर्डिंग देखील दिसून आल्या.

विशाल थुनेजाकडे उतारा

आरोपी आडतिया याला अॅपबाबत विचारणा केली असता, खेळविल्या गेलेल्या बेटिंगचा उतारा आपण विशाल थुनेजा नामक व्यक्तीला देत असल्याची कबुली त्याने दिली. त्या व्यवहारामध्ये आपली भागीदारी असल्याचे देखील त्याने सांगितले. सठ्यांच्या हिशेबाची पाहणी केली •असता त्यात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.

रजिस्टरही जप्त

दोन अन्य मँचवर जे व्यवहार झालेत. ते लिहिलेले रजिस्टर, भारत विरुद्ध इंग्लंड मॅचदरम्यान व्यवहाराचे कागदे देखील जप्त करण्यात आली. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात क्रिमिनल इन्टेलिजन्स युनिटचे प्रमुख एपीआय महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, अंमलदार सुनील लासुरकर आदींनी ही कारवाई केली.


Labels: , , ,

नांदगाव खंडेश्वर येथील गांजा तस्करला अटक

 अमरावती (प्रतिनिधी) दि २९ : गांजा तस्करीत पसार असलेला हनुमान मोहिते हा गत १५ ते २० दिवसापासून राजापेठ ठाण्याच्या हद्दीत भाडयाच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून मलकापूर पोलीस शहरात पोहचले. राजापेठ पोलिसांच्या मदतीने रविवारी (ता. २९) दुपारी त्याला पकडून मलकापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर येथील हनुमान मोहिते । हा गांजा तस्कर असून अमरावतीसह अन्य जिल्ह्यात गांजा पोहचवितो. त्यासाठी तो वेगवेगळ्या युवकांना हाताशी धरून व पैशाचे आमिष देऊन त्यांच्या माध्यमातून विभागात गांजाची तस्करी करतो. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने बडनेरा ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी रवी मारोटकर याला पकडून त्याच्याकडून १०८,  किलो गांजा जप्त केला होता. बडनेरा पोलिसांनी  प्रकरणातील मारोटकर याचे साथीदार व मुख्य सुत्रधाराला  अद्याप अटक केलेली नाही. दरम्यान मलकापूर पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या एका  युवकाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने हनुमान मोहिते याचे  नाव पोलिसांना सांगितले. तेव्हापासून  मलकापूर पोलीस हनुमान मोहिते याच्या मागावर होते. तो गत १५ ते २० दिवसापासून । राजापेठ ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत  राहत असल्याची माहिती मलकापूर पोलिसांना  'मिळाली होती. त्यावरून मलकापूर पोलीस रविवारी  शहरात दाखल झाले. राजापेठ पोलिसांच्या मदतीने त्याचा दिवसभर शोध घेतला. दिल्ली पब्लिक स्कुल परिसरातून त्याला पकडण्यात आले.




Labels: , ,

उबन ले-आऊटमध्ये झाले बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती शहराच्या पूर्वेकडीलसातपुडा पर्वत राजीला लागून असलेल्या मंगलधाम भागातील उबन ले-आऊट येथे रविवारी (ता. २९) दोन वेळा बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक चांगलेच भयभित झालेले आहेत. मंगलधाम भागातील उबन ले-आऊट पहाडाच्या पायथ्याशी आहे. या भागात साईमंदिर आहे. रविवारी सकाळी धुणीभांडी करणारी एक महिला रस्त्याने जात असताना तिला बिबट्याचे दर्शन झाले. तिने थेट घराकडे धाव घेत त्याबाबतची माहिती. नागरिकांना दिली.



  त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास काही नागरिक कोजागिरीनिमित्त घराच्या स्लॅबवर कार्यक्रमात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. या प्रकाराने नागरिकांत चांगलीच भिती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे ज्या भागात बिबटयाचे दर्शन झाले, तेथे महापालिकेकडून पथदिव्यांची व्यवस्था काहीच नाही. त्यामुळे नागरिकांना आता रात्री घराबाहेर पडणे मुश्कील झालेले आहे.

Labels: ,

Sunday, October 29, 2023

शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये - आ.सौ. सुलभाताई खोडके


 अमरावती २९ ऑक्टोबर : -  ज्या प्रमाणे अन्न ,वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे मानवाच्या सर्वागीण विकास व प्रगतीसाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणातून देशाचा , समाजाचा व  कुटुंबाचा विकास  होत असल्याने शिक्षणच हा विकासाचा खरा पाया आहे. त्यामुळे गरीब व आर्थिक दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य परिवारातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर   आजच्या बदलत्या युगात महापालिकांच्या शाळांनी  अद्यावत व आधुनिकतेची  कास धरणे जरुरीचे आहे. यासाठी  त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण ,व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्द करण्याचा आपला संकल्प आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये, यासाठी महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये  केजी पासुनचे तर बारावी  पर्यतचे शिक्षण  उपलब्ध  करून देण्याचा मनोदय  अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला . 
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम  यांची  जयंती  "वाचन प्रेरणा दिना "  निमित्त अमरावती महानगर पालिका शिक्षण विभाग व शोध प्रतिष्ठानच्या वतीने  महापालिकांच्या शाळांमध्ये  आयोजित निबंध स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व मेहंदी कला स्पर्धेचा  बक्षीस वितरण सोहळा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दि.२८ ऑक्टोबर २०२३ रोजी  म.न पा उर्दू माध्यमिक डिजिटल शाळा क्र.८,जमील कॉलनी येथे  मोठ्या थाटात संपन्न झाला.  यावेळी त्या बोलत होत्या . अमरावती महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त-देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते,विधिमंडळ समनवयक-संजय खोडके, मनपा शिक्षणाधिकारी-डॉ. प्रकाश मेश्राम,  सिस्टीम मॅनेजर-अमित डेंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, माजी शिक्षणाधिकारी-डॉ. अब्दुल राजिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी-हाजी रफिक सेठ, सनाउल्लाह सर,उर्दू टीचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष-गाजी जहरोश, नादिममुल्ला सर,जावेद सेठ,अब्दुल राजिक हुसेन, अफसर बेग,सनाउल्लाह ठेकेदार,  बबलूभाई, इम्रानखान,माजी नगरसेवक-इम्रान अशरफी,सय्यद मंजूर,मोहम्मद अबरार,आयटीआय निदेशक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस-भोजराज काळे,मुख्याध्यापक-अब्दुल सईद आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की , अमरावती महापालिकेच्‍या अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या,भौतिक सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांची त्यामानाने पटसंख्या कमी होती  बदलत्या शिक्षण प्रणाली नुसार मनपाच्या शाळा अद्यावत झाल्या नसल्याने पालकांचा याकडे कल दिसत नव्हता. भविष्यात या शाळा टिकल्या पाहिजे व सर्वसामान्य गरीब व गरजू घटकांना  प्रगत व नाविण्‍यपुर्ण शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आजच मनपाच्या शाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने   मनपाच्या शाळांची वर्तमान स्थिती व तेथे नावीन्यपूर्ण सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपण मनपा प्रशासनाची समन्वय साधला .  विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणे आवश्यक असून गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी  यासाठी  मनपाच्या शाळांमध्ये नर्सरी , केजी-वन , केजी-टू व पहीलीचा वर्ग इंग्रजीतून सुरु   करण्यात आले आहेत.  तर अनेक नावीन्यपूर्ण सुधारणा झाल्याने आता पालकांचा आपल्या पाल्यांना प्रवेशित  करण्यासाठी मनपा शाळांकडे कल वाढला आहे.  
शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासह विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यासाठी त्यांचा क्रीडा क्षेत्रातील वाढता कल लक्षात घेता, मनपाच्या शाळांमध्ये २९ फिजिकल एज्युकेशन टीचर्स अर्थातच क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.   महानगरपालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात अधिकाधिक निधीची तरतूद करण्यात आली पाहिजे,याकरिता आपली आग्रही भूमिका व कटीबद्धता राहील असा विश्वास याप्रसंगी  आमदार सौ .सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .  
तर आपल्या अध्यक्षीय संबोधनात मनपा आयुक्त देविदास पवार यांनी विद्यार्थी गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा वाढ यासाठी  अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अत्याधिक वेगाने सुधारणा होत  असून अमरावती शहरांमधील  अनेक खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा  प्रगत झाल्याने  मनपा शाळेसमोर हाऊसफुल्ल चे बोर्ड झळकत असल्याने हि एक चांगली उपलब्धी असल्याचे सांगितले .   विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे व तेही चांगल्या दर्जाचे असले पाहिजे या भावनेतून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनेक सोयी सुविधा पुरविण्याकडे जातीने लक्ष दिल्या जात आहे. एकंदरीत मनपाच्या सर्व शाळांना नवे स्वरूप देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले .   
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी आपल्या संबोधनात मनपा शाळांच्या प्रगती व कामगिरी बाबत प्रशंसा केली . मनपाच्या  शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आजच्या घडीला दर्जेदार शिक्षणासह वाढती पटसंख्या बघता यात शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांचे निश्चितच बहुमूल्य योगदान आहे. मनपा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात तेथिल शिक्षक , मुख्याध्यापक व सर्व घटकांनी केलेल्या प्रयत्नातूनच  मनपा शाळांचे चित्र बदलले असल्याचे गौरवोद्गार संजय खोडके यांनी व्यक्त केले . 
 दरम्यान  याप्रसंगी नेहरू ट्रॉफी मध्ये उपविजेता पद मिळवणाऱ्या नागपुरी गेट स्थित मनपा शालेय विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते हॉकी स्टिकचे वितरण करण्यात आले. यासोबतच शिष्यवृत्ती परीक्षा,मेहंदी स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अलौकिक कामगिरी करीत अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सुलभाताई खोडके यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व कलरफुल स्कुल मिशन अर्थातच बोलक्या भिंती आदींसह वैविध्यपूर्ण नवोपक्रम व नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या शिक्षकवृंदाचा सुद्धा यादरम्यान यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी सायन्स लॅबचे आमदार -सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तदनंतर पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी विविध प्रकारच्या जाती व प्रजातीच्या रोपट्यांचे आमदार महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक-सिस्टीम मॅनेजर-अमित डेंगरे  , सूत्रसंचालन-मोहम्मद तफज्जूल सर,निशात सिद्दीकी,अर्शिया फरहीन यांनी  केले. तर आभार प्रदर्शन-सीमा सहर शेख अफजल यांनी केले.  याप्रसंगी शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी,पालक, शिक्षक,शिक्षिका,आमंत्रित सदस्य व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Labels: , ,

Bachchu Kadu Ayodhya Tour : बच्चू कडू निघाले अयोध्येला,सोयाबीन, कापूस आणि उसाचा प्रसाद चढवणार !

प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला आजपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. त्यासाठी आज ते नागपुरात दाखल झाले. येथून उद्या (ता. २९) ते लखनौला जाणार असून, तेथून कारने अयोध्येला जाणार आहेत. (We are running a campaign called 'Meri Mati Mera Khoon')

अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन सोयाबीन, कापूस आणि उसाचा प्रसाद चढवून शेतकऱ्यांच्या खुशालीसाठी मागणी करणार असल्याचे बच्चू कडूंनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मौलाना अमर अली आणि मंदिराचे पुजारी रामचरणदास यांना इंग्रजांनी फासावर लटकवलं होतं. ते शहीद झाले होते. त्यांचं स्मारक झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.

Labels: , ,

अमरावती : कांद्याच्या दरात तीन दिवसांत दुपटीने वाढ; जाणून घ्या किरकोळ बाजारातील भाव…

 अमरावती : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या फळ आणि भाजीपाला बाजारात आठवडाभरात कांद्याचे प्रतिक्विंटल भाव १ हजार रुपयांनी वाढले आहेत. दररोज आवक कमी-कमी होत असल्यामुळे ही दरवाढ होत आहे.

बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत. दोन, तीन दिवसांपूर्वीच किरकोळ बाजारात एक किलो कांदा ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र, आता एक किलो कांद्यासाठी ग्राहकाला ७० ते ७५ रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.



अमरावती बाजार समितीत २१ ऑक्‍टोबरला ४०८ क्विंटल कांद्याची आवक झाली. सरासरी ३ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. २७ ऑक्‍टोबरला केवळ ३३९ क्विंटल आवक झाली. सरासरी ४ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. सात दिवसांत कांद्याचे दर हजार रुपयांनी वाढले. किरकोळ बाजारात मात्र ते दुपटीहून अधिक वाढले.

एकीकडे उन्हाळ कांदा संपत असताना दुसरीकडे लाल कांदा हळूहळू बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. शनिवारी फक्त एका वाहनातून लाल कांदा बाजार समितीत आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव आता चढेच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाजार समितीत विदर्भातील पांढऱ्या कांद्याची आवक अत्‍यल्प असल्‍याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण भारतात कांद्याची वाढलेली मागणी व कांदा आवकमध्ये झालेली घट याचा परिणाम दरावर झाल्याची माहिती बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. अनेक शेतकऱ्यांकडील कांद्याचा साठा संपुष्टात आला आहे. अशा परिस्थितीत दरवर्षीच्या तुलनेत होणारी खरीप कांद्याची आवक अद्याप सुरू नाही. त्यामुळे पुरवठ्यावर दबाव असल्याने कांदा दरात वाढ झाली. दक्षिण भारतात पाऊसमान कमी असल्याने आंध्र व कर्नाटक राज्यात खरीप कांद्याची लागवड तुलनेत कमी झाली. गुजरात, मध्य प्रदेशातील खरीप आवक होण्यास तीन आठवडे अवकाश आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Labels:

IND vs ENG Playing 11: अश्विन या मोहम्मद शमी, इंग्लैंड के खिलाफ किसे मिलेगा मौका? जानें संभावित प्लेइंग-11

 भारतीय टीम विश्व कप में अपना छठा मुकाबला रविवार (29 अक्तूबर) को इंग्लैंड के खिलाफ खेलेगी। दोनों टीमें लखनऊ के भारत रत्न श्री अटल बिहारी वाजयेपी इकान स्टेडियम में आमने-सामने होंगी। टीम इंडिया की नजर टूर्नामेंट में लगातार छठी जीत पर होगी। उसने अब तक एक भी मुकाबला नहीं गंवाया है। भारत ने इस विश्व कप में ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश और न्यूजीलैंड को हराया है। वह जीत के क्रम को बरकरार रखने के लिए लखनऊ में उतरेगा।


दूसरी ओर, इंग्लैंड की बात करें तो गत विजेता टीम की हालत खराब है। उसका कोई भी बल्लेबाज फॉर्म में नहीं है। यहां तक कि गेंदबाज भी लय में नजर नहीं आ रहे हैं। इस कारण इंग्लैंड की टीम पिछले कुछ मैचों से दो-तीन बदलावों के साथ उतर रही है। इंग्लैंड को पहले मैच में न्यूजीलैंड ने हराया था। उसके बाद उसने बांग्लादेश को हराकर वापसी की, लेकिन फिर हार का क्रम शुरू हुआ। उसे अफगानिस्तान, दक्षिण अफ्रीका और श्रीलंका ने हरा दिया। अगर इंग्लिश टीम इस मैच में नहीं जीतती है तो विश्व कप से बाहर हो जाएगी
दोनों टीमों की प्लेइंग-11 की बात करें तो भारतीय टीम एक बदलाव कर सकती है। हार्दिक पांड्या की चखने की चोट अब तक ठीक नहीं हो पाई है और वह बंगलूरू के राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) में हैं। वहां उनकी देखभाल हो रही है। हार्दिक के बारे में कहा गया था कि वह लखनऊ में टीम से जुड़ जाएंगे, लेकिन अब तक ऐसा नहीं हो पाया है। उनका खेलना इस मैच में भी संदिग्ध है। उनके स्थान पर पिछले मैच में सूर्यकुमार यादव खेले थे और टीम संयोजन को देखते हुए शार्दुल ठाकुर की जगह मोहम्मद शमी को खेलने का मौका मिला था
शमी ने टूर्नामेंट के अपने पहले मैच में शानदार प्रदर्शन करते हुए पांच विकेट चटकाए थे। लखनऊ की पिच से धीमे गेंदबाजों को मदद मिलने की संभावना है और ऐसे में इस मैच के लिए अश्विन को प्लेइंग-11 में जगह मिल सकती है। अगर ऐसा होता है तो बल्लेबाजी भी मजबूत होगी क्योंकि अश्विन आठवें नंबर पर खेलेंगे। अश्विन की वापसी होती है तो शमी या सिराज में से किसी एक को बाहर होना पड़ेगा। इस बात की उम्मीद है कि लगातार मैच खेलने के कारण सिराज को आराम दिया जा सकता है। हालांकि, राहुल द्रविड़ और रोहित शर्मा की हालिया रणनीति को देखें तो दोनों टीम के साथ छेड़छाड़ को ज्यादा पसंद नहीं करते हैं। ऐसे में शमी को बेहतर प्रदर्शन करने के बावजूद बाहर किया जा सकता है।

लखनऊ में इस विश्व कप का यह चौथा मैच होगा। अब तक यहां तीन मैच खेले गए हैं। लक्ष्य का पीछा करने वाली टीम तीन में से दो मैचों में जीती है। अब तक 47 विकेट गिरे हैं। इनमें से 26 विकेट तेज गेंदबाजों ने लिए हैं। वहीं, 15 विकेट स्पिन गेंदबाजों के हिस्से आए हैं। ऐसा माना रहा है कि इंग्लैंड के खिलाफ मैच के दौरान पिच स्पिन गेंदबाजों को मदद पहुंचाएगा। भारतीय टीम इंग्लैंड के खिलाफ अश्विन को उतारकर नई रणनीति अपनाने पर विचार कर रही है।

इंग्लैंड की टीम ने पिछले मैच में हैरी ब्रूक की जगह लियाम लिविंगस्टोन को मौका दिया था, लेकिन वह कुछ खास नहीं कर पाए। ब्रूक ने 32 की औसत से इस विश्व कप में अब तक 128 रन बनाए। ऐसे में उन्हें टीम में वापस लाया जा सकता है। अगर वह आते हैं तो लिविंगस्टोन को बाहर किया जा सकता है।

भारत: रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव।

इंग्लैंड: जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कप्तान/विकेटकीपर), हैरी ब्रूक, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड।

Labels:

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन,जिल्ह्यात 2 हजार 664 मतदार केंद्रे

 येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

जिल्ह्यात 2 हजार 664 मतदार केंद्रे


            अमरावती, दि. 27 (जिमाका): लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. 

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.            दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल. 

सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले. 

            प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही घेता येते. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते. 

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी 14, जमातीसाठी 19, सेक्स वर्करसाठी 1, तृतीयपंथी व्यक्ती 1, दिव्यांगासाठी 10, विद्यार्थ्यांसाठी 18 असे एकूण 64 शिबिरे घेण्यात आली असून या शिबिरामध्ये एकूण 3 हजार 744 अर्ज नवीन मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले. तसेच 12 हजार 259 दिव्यांगाना मतदार यादीत चिन्हांकित करण्यात आले. बीएलओ यांचे मार्फत व्हीआयपी व्यक्तींची माहिती गोळा करून त्यांना चिन्हांकित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व यापुढे दि. 4 व 5 नोव्हेंबर तसेच 25 व 26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत विशेष शिबिर मोहिम राबविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महिला मेळावे, बचतगट, महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येक बीएलओ यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. त्यामध्ये मयतांची संख्या 25 हजार 882, स्थलांतरीत 17 हजार 770, अनुपस्थिती 27 हजार 60 नावे आढळून आली आहेत. आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत बीएलओमार्फत नमुना 7 व 8 चे फार्म भरून घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. 

            पारधी, फासे पारधी, नाथ जोगी, गोसावी, धनगर, अशा विमुक्त भटक्याजमाती या समाजघटकाकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्राची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतेही कागदपत्रे नसले तरी मतदार नोंदणी करू शकणार आहेत. 

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे. या काळात ग्रामसभेचे मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्याअंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. 

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदारसंख्या 12 लक्ष 38 हजार 044, स्त्री मतदार संख्या 11 लक्ष 62 हजार 536 व तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकुण 24 लक्ष 662 होती. तर दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 664 मतदान केंद्रे आहेत. 

            भारत हा तरूणाचा देश आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

           नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे. 

            मतदार यादीची प्रसिध्दी आज, दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यामध्ये सर्वत्र केली आहे. मतदार यादी प्रकाशनाबाबत सविस्तर माहिती अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, महसूल उप जिल्हाधिकारी रणजीत भोसले, निवडणूक नायब तहसीलदार प्रविण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 


Labels:

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा 0721-2552414 क्रमांक उपलब्ध....

 बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा

0721-2552414 क्रमांक उपलब्ध....




अमरावती- शहरातील शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यावर वनविभाग, सतत लक्ष ठेवून आहेत. तसेच वनविभागांतर्गत कार्यरत असलेले शिकार प्रतिबंधक पथकाची चमु परिसरात सतत कार्यरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी व शिकार प्रतिबंधक पथक हे समन्वयाने बिबट या वन्यप्राण्याचे हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या ठिकाणी बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व आहे. त्याठिकाणी नागरिकांनी एकत्र जमावाने येवू नये, तसेच त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चमुला आवश्यक ते सहकार्य करावे, रात्रीचे एकट्याने बाहेर फिरु नये, खोट्या अफवा पसरवू नये. जर कोणाला बिबट हा वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले तर, नियंत्रणकक्षाचा क्रमांक 0721-2552414 यावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती वनविभगाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी केले आहे

Labels:

रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई! कुत्र्याने शोधला २६ किलो गांजा,

 अकोला ते भुसावळ दरम्यान गांधीधाम एक्सप्रेसच्या वॉशरूमध्ये चक्क २६ किलो गांजा आढळून आला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या चमुतील विरू नामक श्वानाने हा गांजा शोधून काढला, हे विशेष.

गांधीधाम एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०८०३) अप मार्गावर आरपीएफचे जमादार संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे त्यांचा वीरू नामक कुत्र्यासोबत अकोला ते भुसावळ या ट्रेनमध्ये तपासणी ड्युटीवर होते. कर्तव्यावर असतानाआचेगाव स्थानकावरून ट्रेन निघताच कुत्रा वीरूने हा डब्याच्या एस ९ च्या पुढे उजव्या बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये दोन सोडलेल्या संशयास्पद पिशव्यामध्ये काही संशयास्पद वस्तू ओळखली. याबाबतची माहिती भुसावळ रेल्वे प्रबंधकांना देण्यात आली. ही गाडी भुसावळ स्थानकावर क्रमांक ४ येथे पोहोचताच दोन्ही बेवासर पिशव्या उतरविण्यात आल्या.

या दोन्ही पिशव्यात एकूण १३ बंडल आढळून आले. गांजाचे वजन २६ किलो २५८ ग्राम एवढी असून, अंदाजे एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५८० रूपये आहे.

Labels:

शिंदे गटाचे मंत्री केसरकर शरद पवारांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती

 

मुंबई :- राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. सकाळी दीपक केसरकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांना सदिच्छा दिल्या. तसंच केसरकर यांनी शरद पवार यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.


शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शालेय आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये होत असलेल्या बदलांवर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शिवाय शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित सुधारणा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारण कशा करता येतील, अशा विविध विषयांवर चर्चा केल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. शरद पवार यांची आज सदिच्छा भेट घेतल्याच या ट्विटमध्ये केसरकर म्हणाले आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.


सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. 40 दिवसांच्या मुदतीनंतरही निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. राज्यभर आंदोलने केली जात आहेत. मोर्चे काढले जात आहेत. उपोषणे केली जात आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच आता शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Labels:

Saturday, October 28, 2023

यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा, सराईतास अटक...

City kotwali police station,Amravati

 अमरावती : एका सराईत दुचाकी चोराला कोतवाली पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. नारायण सुभाष राठोड (३६, रा. वाईइजारा, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.

प्रमोद पांडुरंग पाटेकर (४२) हे अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांनी आपली दुचाकी नमुना येथील पार्किंगच्या ठिकाणी उभी केली होती. ती दुचाकी लंपास करण्यात आली होती. तसेच टाकळी कानडा येथील रहिवासी धीरज राजेंद्र निंघोट (३२) यांची दुचाकी बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती. या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
तपासात दोन्ही गुन्ह्यांत नारायण राठोड याचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही यशस्वी कारवाई कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, मंगेश दिघेकर, मोहम्मद समीर, सागर ठाकरे यांनी केली.


अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही

 


अमरावती : शनिवार  दिनांक २८/१०/२०२३ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे  यांच्‍या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत बस स्टॅन्ड, रुक्मिणी नगर, गर्ल हायस्कूल, डी मार्ट, मालटेकडी, पंचवटी येथे अतिक्रमण निर्मूलनाची  कार्यवाही करण्यात आली.  सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान एक ट्रक  साहित्य जप्त करण्यात आले  सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित 



अमरावती-पबमध्ये रंगत्यायत नशेडी पार्टी, धार्मिक संघटना, लोकप्रतिनिधींची चुप्पी ठरत आहे चर्चेचा विषय !


 Amravati | मॉलमध्ये तरुण कर्मचारी आणि इतर विशिष्ट धर्माचे तरुण मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. पबमध्ये  मुली  विशिष्ट धर्माच्या तरुणांच्या जाळ्यात आल्या आहेत. सभ्यता आणि संस्कृतीला कलंक लावणाऱ्या या प्रसिद्ध मॉलमध्ये सुरू असलेल्या पबबाबत शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सुसंस्कृत कुटुंबांना मुलांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. कुठल्यातरी वाईट संगतीत अडकल्यावर ते या मॉल चालवणाऱ्या पबकडे वळतील अशी भीती त्यांना वाटते.

विशेष म्हणजे मुलींना पबमध्ये मोफत प्रवेश आणि मोफत पेये दिली जात आहेत. तर मुलं नियमित प्रवेश शुल्क आणि इतर शुल्क देखील मोठ्या प्रमाणात घेतले जातात. या पबमधील मुलींना मोफत ऑफरचे आमिष दाखवले मॉलमध्ये पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने मुलेही मॉलचा आनंद लुटतात.


तरूणाई ड्रग्ज आणि नाचण्यात मग्न होत आहे...अल्पवयीन मुलींना चुकीची दिशा दाखवून गोंधळ घातला जात आहे. 

बडनेरा रोडवर असलेल्या बहुमजली मॉलच्या वरच्या मजल्यावर पबच्या नावाखाली सुरू असलेल्या ज्यामध्ये बाहेरगावातून येथे शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थिनींना गोवले जात आहे. मुलींना पबमध्ये मोफत प्रवेशाची खास ऑफर देऊन. येथील तरुण ग्राहकांना आकर्षित करून या व्यवसायाला गती दिली जात आहे


 


Money thief python snake: क्या कभी आपने ‘पैसा चोर’ अजगर देखा है? अगर नहीं, तो ऐसे ही एक सांप का एक वीडियो सोशल मीडिया में वायरल हो रहा है, जिसमें सांप नोटों की गड्डी को घर में ले जाते हुए दिखता है. इंटरनेट पर जब लोगों ने यह वीडियो देखा तो वे हक्के-बक्के रह गए. वीडियो में दिख रहा अजगर काफी बड़ा और मोटा है, जो देखने में काफी खतरनाक लगता है. इस वीडियो ने इंटरनेट पर तहलका मचा दिया है.

देशात दहा महिन्यांत १५० हून अधिक वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण....

नागपूर : जागतिक व्याघ्रदिनी भारतातील वाघांची संख्या जाहीर झाली आणि त्यांच्या संख्यावाढीने व्याघ्रप्रेमींच्या आनंदाला भरते आले. मात्र, त्यांच्या आनंदात विरजण घालणारी वाघांच्या मृत्यूची आकडेवारी आता उजेडात आली आहे. २०२३च्या पहिल्या दहा महिन्यांत देशात १५०हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही ४० पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत.

सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत महाराष्ट्रात ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर मात्र देशात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे १४८ आणि ३२ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जागतिक व्याघ्रदिनी जाहीर करण्यात आल्यानुसार वाघांच्या संख्येत महाराष्ट्र ४४४ वाघांसह चौथ्या क्रमांकावर आहे, पण मृत्यूचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यांपैकी अनेक मृत वाघांची नोंद ‘नैसर्गिक मृत्यू’ अशी करण्यात आली आहे, पण या नैसर्गिक मृत्यूमागे अनैसर्गिक कारणे असू शकतात. मानव-वन्यजीव संघर्षात वीजप्रवाह, विषप्रयोग यांसारखी कारणे आणि शिकारीचे धोके वाढत आहेत. त्यामुळे भारतातील वाघांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांच्या वर्तुळात व्यक्त केली जाते. त्याच वेळी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कॉरिडॉरमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वाघांच्या मृत्यूमागे हीदेखील कारणे आहेत.

नियंत्रणासाठी काय?
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यासंदर्भात म्हणाले की २०१३ मध्ये वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आल्यानंतर मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखा स्थापन झाली. त्यातून चांगले काम झाले. नागपूर प्रादेशिक वनखात्यानेही उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या नेतृत्त्वाखाली वाघांच्या मृत्यूची अनेक प्रकरणे समोर आणली, त्यांचा तपास केला. याच पद्धतीचे काम राज्यात झाले, तर वाघांच्या वाढत्या मृत्यूंवर नियंत्रण आणता येईल.

जबाबदारी कोणाची?
नियोजनाचा अभाव, खातेप्रमुखांची प्रशासनावरील सैल झालेली पकड या बाबी वाघांच्या मृत्यूस जबाबदार आहेतच, पण वनखाते आणि वन्यजीव, गावकरी यांच्यातील दुवा म्हणून नियुक्त केलेले मानद वन्यजीव रक्षक आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य त्यांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडतात का, हे पडताळणे आवश्यक असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा 0721-2552414 क्रमांक उपलब्ध....

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा

0721-2552414 क्रमांक उपलब्ध....




अमरावती- शहरातील शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यावर वनविभाग, सतत लक्ष ठेवून आहेत. तसेच वनविभागांतर्गत कार्यरत असलेले शिकार प्रतिबंधक पथकाची चमु परिसरात सतत कार्यरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी व शिकार प्रतिबंधक पथक हे समन्वयाने बिबट या वन्यप्राण्याचे हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या ठिकाणी बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व आहे. त्याठिकाणी नागरिकांनी एकत्र जमावाने येवू नये, तसेच त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चमुला आवश्यक ते सहकार्य करावे, रात्रीचे एकट्याने बाहेर फिरु नये, खोट्या अफवा पसरवू नये. जर कोणाला बिबट हा वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले तर, नियंत्रणकक्षाचा क्रमांक 0721-2552414 यावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती वनविभगाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी केले आहे

Labels:

खोकल्याच्या सिरपचा नशेसाठी वापर, मोफत उपचारामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

 


अमरावतीः शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा मोफत झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खोकल्याच्या सिरपची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ७० टक्के रुग्ण हे फक्त खोकल्याची औषधी घेण्यासाठी येतात. त्यामुळे जवळपास महिन्याला रुग्णालयातून ५ हजारांच्या वर सिरपच्या बाटल्या लागत असल्याचे चित्र आहे.

शासकीय रुग्णालयात खोकल्याची सिरप मोफत मिळत असल्याने अनेकजण या सिरपचा वापर हा नशेसाठी करत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच औषधी दिली जाते. परंतु अनेक रुग्ण हे खोकला असल्याची खोटी माहिती देतात. त्यामुळे अनेक रुग्ण हा डॉक्टरांसमोरच खोकलून दाखवतो. आणि डॉक्टरांना औषधी लिहून देण्याची मागणी करतो. त्यामुळे रुग्ण जे सांगताहेत त्यावर नाईलाजाने विश्वास ठेवून सिरप लिहून देतात.