Sunday, November 26, 2023

पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर टीका

 

मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Labels: , , ,