Wednesday, November 1, 2023

Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंना निमंत्रण नाही !

 Mumbai News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आज आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रित करण्यात न आल्याने सराकारने ठाकरे गटाकडे दुर्लक्ष केले, असे बोलले जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्वसहमतीने आरक्षणावर सकारात्मक विचार करून तोडगा काढण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायंच का? मराठा आरक्षणाचे मार्ग देण्याचे मार्ग कोणकोणते आहेत? यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढण्याचा दृष्टीने यावर चर्चा होणार आहे.

Labels: , , ,