Wednesday, December 20, 2023

पंडित प्रदीप मिश्रा यांचा ठाम विश्वास मनुष्याचे कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते



 

अमरावती : कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते. पण आपला विश्वास पक्का असला पाहिजे. त्यामुळे चांगले कर्म करा, पराभव कदापीही होणार नाही, असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी सोमवारी येथे केले.

येथील हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने १६ ते २० डिसेंबर या दरम्यान नजीकच्या हनुमान गढी येथे आयोजित शिव महापुराण कथा प्रवचन करताना ते भाविकांशी थेट संवाद साधत होते. बडनेरा येथील अनिल जगताप नामक भाविकाने पंडित मिश्रा यांना माणसाचं नशीब बदलते का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा कर्म चांगले असेल तर नशीब बदलते. पण आपला त्यावर विश्वास पक्का असला पाहिजे. विश्वास हाच सर्वात मोठा वृक्ष असल्याची पुष्टीही पंडित प्रदीप मिश्रा यांनी जोडली. हनुमान चालिसा पठण केले म्हणून प्राचीन काळात तुलसीदास जेलमध्ये गेले आजच्या युगात राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकले. पण घाबरू नका, 'महादेव का महाकाल' सोबत असल्यास कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रमात राहू नका, साधुसंत हे चमत्कार नव्हे तर प्रवचन करतात. त्यामुळे कर्मासंग जिद्द, चिकाटी असेल तर परमात्मा मिळतो, असे पंडित मिश्रा म्हणाले. दरम्यान खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया आदींनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले.



published by_harish mohan rathi_amravati city news