Sunday, November 26, 2023

ज्याला टिपायचे त्याला योग्यवेळी टिपतो; देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

 

मुंबई :- उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणुन ते सर्व गोष्टी एका फोटोग्राफरच्या नजरेतून बघत असतात. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या सामान्य दृष्टीकोणातून बघत असतो. पण शेवटी ते काही गोष्टी कॅमेऱ्यातून टिपून घेतात. मात्र मी सामान्य असल्याने योग्य टप्प्यात आल्यानंतर काय काय टिपायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला टिपायचे आहे त्याला मी योग्यवेळी टिपतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पांडा यांच्या वाइल्ड लाइफ फोटोंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस  माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले डॉ. रमाकांत पांडा यांची हार्ट सर्जन म्हणून ओळख आहे. परंतु तेवढेच ते सिद्धहस्त चित्रकार देखील आहेत. विशेषतः वाइल्ड लाइफमध्ये त्यांनी सुंदर फोटो टिपले आहेत. आज ती सगळी चित्र बघायला मिळाली. ही प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असे वाटते की, अतिशय सुंदर आपल्या निसर्गाचं वैविध्य त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपले आहे. निसर्गातील प्राणी त्यांनी टिपून जनतेच्या नजरेसमोर आणले आहे. हे सर्व करत असताना त्यांना जो काही मोबदला मिळतो ते दान करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी चित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जंगलाना वाचवले पाहीजे असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जंगलाना वाचवले पाहिजे यामध्ये माझे काही दुमत नाही. पण २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांत फॉरेस्ट कव्हरेजमध्ये वाढ केली असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

Labels: , ,