Tuesday, December 19, 2023

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,