Wednesday, December 20, 2023

गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्दला - एकाच रात्री चार घरफोड्या - कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रनजर

amravaticitynews.com


तिवसा : थंडीत ग्रामीण भागातील परिसरात लवकरच शांतता पसरते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट करणे सुरू केले आहे. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरुदेवनगर व शेंदोळा खुर्द येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याची घटना रविवारी - उघडकीस आली. विशेष म्हणजे चारही घरातील सदस्य बाहेरगावी असल्याने दिवसा रेकी करून मध्यरात्री ही कुलूपबंद घरे फोडण्यात आली आहे.

गुरुदेवनगर येथील नरेंद्र कर्डिले हे - उपचारासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. तसेच व्ही. टी. - इंगळे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न - केला असता शेजाऱ्यांच्या सतर्कतेने - चोरट्यांचा डाव फसला.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

-

भाडेकरूसंबंधी आवश्यक माहिती ठेवा

अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देता वैयवित्तक माहिती देऊ नये, तसेच बाहेरगावी जातांना शेजारच्यांना कल्पना द्यावी. ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्या भाडेकरूंची संख्या भरपूर आहे. तेव्हा घरमालकांनी भाडेकरूसंबंधी माहिती, त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड आदींचा तपशील संग्रहित ठेवावा, असे आवाहन तिवसा पोलिसांकडून करण्यात आले.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

Labels: , , ,

अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना अद्यापही कुलूप अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका



अमरावती : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २३१३ अंगणवाडी सेविका व २३१३ मदतनीस, तसेच १४७ मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून, पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील २५०० अंगणवाड्यांना 'टाळे' लागले आहे.

परिणामी, मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले, तसेच आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, शासन व प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात अंगणावीडी सेविका, मिनी अंगणवाडी व सेविका, मदतनीस आदी सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी केंद्रात बालके पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात; परंतु अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झाली आहेत.


या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.

अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक अडचणींचा सामना करत आहेत. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

-महेश जाधव,जिल्हाध्यक्ष अंगणवाडी बालकवाडी कर्मचारी युनियन



Labels: , ,

Tuesday, December 19, 2023

विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले

 


AMRAVATI CITY NEWS BREAKING
विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले


The leopard caught from the Vidarbha college premises has now been released in its natural habitat

Labels: , , ,

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,

फोनपे'त पैसे नव्हते म्हणून १५ ग्रॅमची चेन हिसकावली





अमरावती : एका तरुणाला धाक दाखवून त्याच्या फोन पे अकाउंटमध्ये पैसे नसल्याने त्याच्याकडील १५ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. १६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास संविधान चौकात ही घटना घडली, निखिल खडसे (३०, रा. विलासनगर) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सागर काकणे (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व अनिकेत नामक तरुणाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.
निखिल खडसे हा मित्राशी बोलत असताना तेथे आरोपी आले. त्यांनी निखिलला कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला. ते मोबाइल घेऊन जाऊ लागल्याने निखिल व त्याचा मित्र सुद्धा सागरच्या मागे गेले. सागर काकणे व अनिकेत हे दोघे निखिल व त्याच्या मित्राला अंधारात घेऊन गेले. तेथे निखिलला पैशाची मागणी केली. त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपीने फोन पे जबरदस्तीने उघडायला लावले. परंतु अकाउंटला पैसे नसल्याने आरोपीने निखिलला मारहाण केली. तथा त्याच्या गळ्यातील चेन हिसकून नेली. निखिलच्या मित्राने पोलिसांच्या डायल११२ वर कॉल केला.


 

Labels: , , ,

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? 'सायबर'चे मनुष्यबळ अपुरे : गुन्हेगार परराज्यांत; तक्रारींचा ओघ

अमरावती : कोरोना काळानंतर देशभरात लोकांकडून ऑनलाइन डिजिटल बँकिंगचा वापर अधिकाधिक केला जात आहे. ऑनलाइन खरेदीवरही नागरिक भर देऊ लागले आहे. यामुळे सायबर क्राइममध्येही वाढ होऊ लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष, भूलथापा देत, तर कधी भीती दाखवून परस्पर बैंक खात्यात लाखो ते कोट्यवधी रुपये वळवून फसवणूक केली जात आहे. गुन्हेगार परराज्यांतील असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सायबर पोलिसांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

रोज किती तक्रारी येतात?

शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दररोज विविध प्रकारच्या सरासरी दोन ते तीन तक्रारी येतात. तक्रारीचे स्वरूप बघून गुन्हे दाखल करून घेतले जातात. फसवणुकीसह सोशल मीडियाचे अकाउंट हॅकिंगच्या तक्रारी येतात.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

१६ कर्मचारी

पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात १६ अंमलदार आहेत. मात्र, त्यांनादेखील मर्यादा आहेत.सायबर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ किती? एक पोलिस निरीक्षक १ एपीआय, एक पीएसआयसायबर ठाण्याकरिता एक पोलिस निरीक्षक आहे. ती ठाणेदारी गजानन तामटे यांच्याकडे आहे.सायबर ठाण्यात एक सहायक पोलिस निरिक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

अडचणी काय?

आरोपी एकच, गुन्हे अधिक: कधी-कधी सायबर गुन्हेगार एकच असतो; मात्र त्याच्यावरगुन्हे वेगवेगळे असतात. सायबर गुन्हेगाराचा माग काढताना त्यामुळे अडचणी उद्‌भवतात.तपासाचे धागेदोरे परराज्यांत: सायबर गुन्ह्यांच्या सर्वच तपासाचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या  बाहेर असल्याचे समोर येते. यामुळे या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत दौरे करावे लागतात.

बंदोबस्ताची जबाबदारी अधिवेशनासारखे मोठे कार्यक्रम असो किंवा मोठ्या राजकीय व्यक्तीचे दौरे असल्यास किंवा त्यांचे कार्यक्रम असल्यास शहराबाहेरच्या वाढीव बंदोबस्ताचाही ताण सायबर पोलिसांना झेलावा लागतो.

 कोर्टाच्या वाऱ्या : अनेकदा ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षकाला आरोपपत्र व अनुषंगिक कामासाठी न्यायालयात जावे लागते. कधीकाळी नागपूर उच्च न्यायालयाच्या वाऱ्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात.

गरज किती कर्मचाऱ्यांची?

दोन लाखांवरील फसवणुकीबाबतच्या तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, अन्य सर्व तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. परिणामी, अधिक मनुष्यबळाची गरज आहे.सायबर ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी बहुतांश तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात नोंदविल्या जातात. अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. गुन्हे निखंदूत काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Labels: , , ,

लोकसभेपूर्वी होणार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने मागविली पात्र अधिकाऱ्यांची माहिती


अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात येणार आहेत. हे अधिकारी सध्या कोणत्या पदावर कार्यालयात आणि गट पाच वर्षांत कोठे कोठे काम केले आहे. अधिक माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात बदल्या होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्यानंतर

सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणाऱ्या या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि नाहीत तहसीलदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. लोकसभेसाठी उपजिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तालुका तहसीलदार यांना त्यांचे सहायक म्हणून काम करावे लागते अधिकारी जिल्ह्याचा रहिवासी असल्यास स्थानिक राजकीय नेते मंडळींची त्यांची जवळीक असते त्यामुळे निवडणूक कामात पारदर्शकपणा येणार नाही अशी निवडणूक आयोगाला वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.


Labels: , , ,

नाकाबंदीत धारणी पोलिसांनी रोखली ५८ गोवंशाची कत्तल


धारणी/अमरावती : मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात होणारी ५८ गोवंशाची वाहतूक, कत्तल धारणी पोलिसांनी रोखली. मध्य प्रदेश ते अकोट मार्गावर १७ डिसेंबरला झांझरी ठाणाजवळ नाकाबंदी करून ती कारवाई केली.

घटनास्थळाहून शेख असलम शेख हासम (३५), अन्सार खान समशेर खान (२२), कादिमोददीन इक्रामोददीन (३५), मो. सोहेल मो. सुलतान (३५), अरबाज खान अयुब खान (२५) व अ. शरीफ अ. लतिफ (३६,

रा. हिवरखेड, ता. आकोट, जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. ते ५८ गोवंशांना अमानुषरीत्या एकमेकांना बांधून कत्तलीकरिता घेऊन जातांना मिळून आले. आरोपींकडून ७ लाख किमतीचे ५८ गोवंश व २.५० लाखांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या, एसडीपीओ अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणीचे ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, रिना सदार, अंमलदार विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुडधे, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, राम सोळंके आदीनी केली.

Labels: , , ,

संत्रा उत्पादकांसाठी ठोस धोरण राबवावे अॅड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी, सरकारवर ताशेरे



अमरावती : विदर्भातील शेतकरी दरवर्षी सुमारे १२ ते १५ लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पन्न घेत असतात. मात्र, या संत्र्याला निर्यात धोरण राबविण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. निर्यातीसाठी असलेल्या विशिष्ट प्रोटोकॉलमध्ये केंद्र सरकारने संत्र्याची नोंद केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या देशात संत्रा पाठवायचा, याची माहिती मिळाली नाही. परिणामी राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन परदेशात पाठवता येत नाही. राज्यात पाच खासगी संत्रा निर्यात केंद्र आहेत, मात्र एकही सरकारी निर्यात केंद्र नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत केला.

संत्रा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात विदर्भातील असून, लाखो मे. टन संत्रा उत्पादन होते. मात्र, यापैकी अत्यंत कमी प्रमाणात संत्र्याची निर्यात परदेशात केली जाते. केवळ बांगलादेशातच संत्र्याची निर्यात केली जात असून, अन्य देशांमध्ये संत्र्याची मागणी आहे का? किंवा कोणत्या पद्धतीचा संत्रा अन्य देशांमध्ये खाल्ला जातो, याबाबतची कोणतीही माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नाही. ही माहिती प्राप्त होण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा किंवा केंद्र सरकारच्या आयसीसीआर यांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. विशिष्ट प्रोटोकॉल नोंद करताना संत्रा या पिकाची नोंद केली गेली नसल्याने ही माहिती या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे ठाकूर म्हणाल्या. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी अपेडा आणि आयसीसीआर या संस्थांमध्ये संत्रा निर्यातीबाबत सामंजस्य करार झाला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही. शेतकऱ्यांना निर्यातक्षम संत्रा उत्पादन करण्यासाठी सरकारने निर्यात केंद्र उभारावे, अशी मागणी अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली.


Labels: , , ,

Sunday, November 26, 2023

कुन्हा येथील 'त्या' बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस सुरूच आरोग्य विभाग पुन्हा पाठविणार चमू




करजगाव : तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील बोगस डॉक्टरच्या तक्रारीपश्चातही त्याची प्रॅक्टिस सुरूच असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. चांदूर बाजार तालुक्यात कुन्हा देशमुख येथे देबाशिष सिकंदर हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या २० वर्षांपासून मूळव्याधसह इतर आजारांवर उपचाराचा बनाव करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कुठली जीवितहानी झाली नसली तरी या अज्ञानी व्यक्तीमुळे शक्यता केव्हाही खरी होऊ शकते. संबंधित व्यक्तीबाबत तक्रार केली असता, आरोग्य विभागाने कुन्हा देशमुख गाठले होते. त्यावेळी देबाशिषने पलायन केले होते. मात्र, तेव्हापासून आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे वळून पाहिले नाही. परिणामी बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात आहे. तालुका आरोग्य प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे.


आरोग्य विभागाची चमू गेली असता, तो बोगस डॉक्टर मिळाला नाही तसेच दवाखाना असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चमू पाठवून पाहणी करणार आहे. बोगस डॉक्टर मिळाल्यास नक्की कारवाई केली जाईल.

डॉ. ज्योस्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार

Labels: , ,

ग्रामसभेद्वारे होणार मतदार यादीची दुरुस्ती



अमरावती : जिल्हा प्रशासनाद्वारा ९ डिसेंबरपर्यंत दर शनिवारी व रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी व आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. याचदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन होईल व याद्वारे आवश्यक दुरुस्ती करून अचूक मतदार यादी करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी सांगितले. यावेळी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय उपस्थित होत्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदार यादीत १८ वर्षांवरील नागरिकांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये कुणीही वंचित राहायला नको. याशिवाय स्थलांतरित व अन्यत्र रहिवासी नागरिकांची नावे वगळणे महत्त्वाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान त्यांना मतदार, मृत, स्थलांतरित नागरिकांची माहिती देऊन सहकार्य करावे. एकदा उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदार यादीमध्ये बदल करण्यात येणार नसल्याचे कटियार म्हणाले.शाळा, महाविद्यालयांत कॅम्प सुरू असून, १८ वर्षांचे झालेले व होत असलेल्या मतदारांच्या नावनोंदणीचा व्यापक कार्यक्रम सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, रणजित भोसले, अनिल भटकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख उपस्थित होते.


  मतदार यादीचे शुद्धीकरण, आठ हजार मतदार कमी

जिल्ह्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये २५,००,५८० मतदार होते व २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २३,९२,५३५ मतदार संख्या आहे. या १० महिन्यांत तब्बल ८०४५ मतदार कमी झाले. बीएल- ओंद्वारा घरोघरी भेटी देण्यात आल्या व याद्वारा मृत, स्थलांतरित, दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली. यातून मतदार संख्या कमी झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.



Labels: , ,

आज का राशिफल | Today Horoscope 26 November 2023: Forecast For All Zodiac Signs



Labels: , ,

दर्यापुरात एकाच परिसरातील चार घरे फोडली; पोलिसांपुढे आव्हान


 दर्यापूर
: स्थानिक नगर परिषदेजवळील शिक्षक कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री चार घरे फोडून चोरट्यांनी रोकड व दागिने चोरून नेले.हरिनारायण राजाराम मंडवे (रा. शिक्षक कॉलनी) हे मुलाचा अपघात झाल्याने रुग्णालयात आहेत. घरातील कपाटामधून सोन्याची नथ, तोरड्या, काही रोकड चोरीला गेली. शिक्षक सोमवंशी यांचे भाडेकरी दामोदर चांदूरकर यांचे बंद घर फोडून कपाट व इतर ठिकाणी ठेवलेले पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीची लक्ष्मी मूर्ती, गणपती, तोरड्या तसेच ११ हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर घरमालक व खाली आणखी भाडेकरी असतानासुद्धा आवाज झाला नाही. तिसरी चोरी नुरोद्दीन कदीरोद्दीन यांच्याकडे झाली. भाडेकरूच्या खोलीची कडी लावून चोरट्यांनी नुरोद्दीन यांच्या घरात प्रवेश केला.त्यांच्या घरातून दहा हजार रुपये लंपास झाले आहेत. याच ठिकाणी चौथे घरसुद्धा चोरट्यांनी फोडले. परंतु, घरमालकाची तक्रार प्राप्त झाली नाही. पोलिसांची गस्त असतानादेखील घरफोड्या कशा होतात, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

घरफोड्यांची पुनरावृत्ती

दोन महिन्यांपूर्वी दर्यापुरात चार ते पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता चार ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


कलीम शाह जलील शाह (३२, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) या मागील रेकॉर्डवरील आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शहरातील काही चोयांची माहिती घेण्यात येत आहे. - संतोष ताले, ठाणेदार

Labels: , ,

अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान



 अमरावती : काँग्रेस आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहेत. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा देऊन संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. त्या भूमिकेवर ठाम राहत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने 'घर घर संविधान' अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या आ.अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली. २०१४ पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर देशाचे संविधान हे एकच सशक्त उत्तर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला, तर तो नेहमीच प्रगतिपथावर राहील. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशात शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया आ. ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते, याचा गाढ विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान जिल्ह्यात राबवणार असल्याचे आ. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Labels: , ,

ज्याला टिपायचे त्याला योग्यवेळी टिपतो; देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

 

मुंबई :- उद्धव ठाकरे हे स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणुन ते सर्व गोष्टी एका फोटोग्राफरच्या नजरेतून बघत असतात. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या सामान्य दृष्टीकोणातून बघत असतो. पण शेवटी ते काही गोष्टी कॅमेऱ्यातून टिपून घेतात. मात्र मी सामान्य असल्याने योग्य टप्प्यात आल्यानंतर काय काय टिपायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला टिपायचे आहे त्याला मी योग्यवेळी टिपतो, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आज जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पांडा यांच्या वाइल्ड लाइफ फोटोंच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस  माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले डॉ. रमाकांत पांडा यांची हार्ट सर्जन म्हणून ओळख आहे. परंतु तेवढेच ते सिद्धहस्त चित्रकार देखील आहेत. विशेषतः वाइल्ड लाइफमध्ये त्यांनी सुंदर फोटो टिपले आहेत. आज ती सगळी चित्र बघायला मिळाली. ही प्रदर्शनी बघितल्यानंतर मला असे वाटते की, अतिशय सुंदर आपल्या निसर्गाचं वैविध्य त्यांनी आपल्या कॅमेरातून टिपले आहे. निसर्गातील प्राणी त्यांनी टिपून जनतेच्या नजरेसमोर आणले आहे. हे सर्व करत असताना त्यांना जो काही मोबदला मिळतो ते दान करतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी चित्र प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर जंगलाना वाचवले पाहीजे असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जंगलाना वाचवले पाहिजे यामध्ये माझे काही दुमत नाही. पण २०१४ ते २०१९ पर्यंत मी मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांत फॉरेस्ट कव्हरेजमध्ये वाढ केली असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

Labels: , ,

पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर टीका

 

मुंबई :- मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही ठिकठिकाणी सभा घेत जरांगे यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहेत. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही घेण्यास ते मागेपुढे बघतात, असे म्हणत गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) जरांगेला लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिले होते. मात्र काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या असून त्यांच्या सांगण्यानुसार ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचे नावही घेत नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असे काय चालेल? असा सवाल करत ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Labels: , , ,

AMRAVATI POLICE | शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी जेरबंद

अमरावती/प्रतिनिधी:-शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी असलेल्या अट्टल चोरट्यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.सदर आरोपींपासून शहरातील पाच गुन्हे उघड झाले असून चोरट्यांकडून तीन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज पत्र परिषदेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली.
शंकर सुभाष बनसोड व ४२ वर्ष रा. भीम नगर अमरावती,परमेश्वर अशोक सुखदेवे व १९ रा. केडिया नगर अमरावती व पंकज राजू गोंडाने व २७ वर्ष रा.चौरे नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तीनही अट्टल चोरट्यांची नावे आहे.सदर आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध ठाणे अंतर्गत येणार्‍या परिसरांमध्ये बंद घरांना निशाणा बनवून घरफोडी करीत होते.अशातच त्यांनी दिवाळीच्या वेळी सुद्धा घरफोडी केली.गुप्त माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अतिशय मेहनतीने या तीनही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.
चोरट्यांनी शहरातील राजापेठ मध्ये तीन बडनेरा मध्ये एक व नांदगाव पेठ मध्ये एक झालेल्या घरफोडीचे गुन्हे कबूल केले आहे तर आतापर्यंत तीनही आरोपींनी शहरातील तब्बल १५ घरफोडी केल्या आहेत.आरोपींमधून शंकर बनसोड व पंकज गोंडणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून परमेश्वर सुखदिवे याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात आरोपी पंकज गुंडाणे हा ११ ऑक्टोंबर रोजी नागपूर जेलमधून सुटला तेव्हापासून तो सतत अमरावती शहर,अमरावती ग्रामीण, तसेच नागपूर शहरात चोरी घरफोडीचे गुन्हे करत आहे.सदर आरोपी हा पोलीस कोठडी मध्ये असून त्याच्याकडून अन्य माहिती घेणे सुरू आहे.आरोपींपासून आणखी दहा ते पंधरा अधिक गुन्हे उघडकीस येऊन मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी दर्शविली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी,पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, प्रभारी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, गंगाधर जाधव, छोटेलाल यादव,सागर सरदार, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, शेख वकील यांनी केली.

Labels: , ,

DELHI | तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे? : बिल गेट्स

नवी दिल्ली : माणसांच्या कामांचे तास किती असावेत? यावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तीन दिवसांचा आठवडा असला तरीही ठीक आहे. तसेच एआयबद्दलही त्यांनी भाष्य केले. AI मुळे तुमची नोकरी जाईल असे नाही मात्र यामुळे गोष्टी बदलतील इतके नक्की असे ही गेट्स यांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेचे विनोदी कलाकार आणि लेखक ट्रेव्हर नोह यांच्या पॉडकास्ट 'व्हॉट नाऊ'मध्ये बोलताना त्यांनी यावर  भाष्य केले. 
 तीन दिवसांचा आठवडा असायला काय हरकत आहे?
 बिल गेट्स म्हणाले,'' तीन दिवसांचा आठवडा असेल तरीही काही हरकत नाही.नोकऱ्यांमध्ये AI सारखे कृत्रिम तंत्रज्ञान येत आहे त्याविषयी काय सांगाल? असे  विचारले असता बिल गेट्स म्हणाले एक दिवस असाही येऊ शकतो की खूप मेहनत करावी लागणार नाही. आपल्या जगतात अशी एक वेळ येऊ शकते की आठवड्यातले तीन दिवसच काम केले तरीही चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी युवकांनी ७० तास काम केले पाहिजे असे  म्हटले होते. त्यानंतर आता बिल गेट्स यांचे हे वक्तव्य चर्चेत आले.
 एक असेही जग असू शकते जिथे मशीन द्वारे जेवण तयार केले जाईल, जीवनावश्यक वस्तू तयार केला जातील आणि लोकांना आठवड्यात पाच दिवसांऐवजी फक्त तीन दिवस काम करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बिल गेट्स म्हणाले की, याचा प्रभाव नक्कीच मोठा पडणार आहे. मात्र माणसांचे काम AI संपवणार नाही. कामाच्या पद्धतींमध्ये बदल किंवा ज्याला फरक म्हणता येतील असे होतील, असे ही बिल गेट्स म्हणाले.
 लोकांना कमी कालावधीसाठी काम करु देण्यास हरकत नसलेले बिल गेट्स हे एकमेव व्यावसायिक नाहीत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनीही साडेतीन दिवसांचा आठवडा आणि बाकी सुट्ट्या असतील असे एक वक्तव्य केले होते.इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले होते. 
 पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले होती की, भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिले होते. तर काहींनी त्यांना विरोध दर्शवला होता. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे नारायण मूर्ती यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा एकदा नेटिझन्सना आठवण झाली.

Labels: , ,

Badnera | मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर...

अशा धावतील विशेष गाड्या -
- ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ८ वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२४९ मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९.३० पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबर रोजी दादर येथून १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबर रोजी दादर येथून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल
- सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र. ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १३.३० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल.

Labels: , ,