Thursday, November 16, 2023

Bhatkuli | भातकुलीच्या राम मंदिराला २० लाखांच्या निधीचे पत्र

अमरावती: भातकुली येथील प्राचीन राम मंदिराला दिवाळीच्या दिवशी आग लागली होती. मात्र नागरिकाच्या सतर्कतेमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आग विझविली. श्रीराम मंदिर हे सुखरूप आहे. परंतु मंदिरातील काही भागाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती आमदार रवी राणा यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी तथा नगरपंचायत भातकुली सीओ यांच्याशी चर्चा करून बुधवारी २० लाखांचा निधीचे पत्र मंदिर विश्वस्तांना प्रत्यक्ष दिले.



आमदार राणांनी श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण केले आणि समस्त भक्तगण, भातकुली येथील नागरिकांना व कार्यकर्त्यांना समक्ष निधीचे पत्र आमदार रवी राणा यांनी दिले. यावेळी  अध्यक्ष योगिता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडळकर, दिनेश मंत्री, दिलीप मंत्री, गिरीश कासट, सत्तू मंत्री, ओमप्रकाश राठी, शंकर डोंगरे, डॉ सोळंके, सद्दाम खान, गोविंद बोरा, विजय बोरा, गजानन भोपसे, रामेश्वर लढ्ढा, नरेश बाहेती, पोलिस निरीक्षक वांगे, उपस्थित होते.


Labels: , ,