Tuesday, December 19, 2023

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? 'सायबर'चे मनुष्यबळ अपुरे : गुन्हेगार परराज्यांत; तक्रारींचा ओघ

अमरावती : कोरोना काळानंतर देशभरात लोकांकडून ऑनलाइन डिजिटल बँकिंगचा वापर अधिकाधिक केला जात आहे. ऑनलाइन खरेदीवरही नागरिक भर देऊ लागले आहे. यामुळे सायबर क्राइममध्येही वाढ होऊ लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष, भूलथापा देत, तर कधी भीती दाखवून परस्पर बैंक खात्यात लाखो ते कोट्यवधी रुपये वळवून फसवणूक केली जात आहे. गुन्हेगार परराज्यांतील असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सायबर पोलिसांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

रोज किती तक्रारी येतात?

शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दररोज विविध प्रकारच्या सरासरी दोन ते तीन तक्रारी येतात. तक्रारीचे स्वरूप बघून गुन्हे दाखल करून घेतले जातात. फसवणुकीसह सोशल मीडियाचे अकाउंट हॅकिंगच्या तक्रारी येतात.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

१६ कर्मचारी

पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात १६ अंमलदार आहेत. मात्र, त्यांनादेखील मर्यादा आहेत.सायबर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ किती? एक पोलिस निरीक्षक १ एपीआय, एक पीएसआयसायबर ठाण्याकरिता एक पोलिस निरीक्षक आहे. ती ठाणेदारी गजानन तामटे यांच्याकडे आहे.सायबर ठाण्यात एक सहायक पोलिस निरिक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

अडचणी काय?

आरोपी एकच, गुन्हे अधिक: कधी-कधी सायबर गुन्हेगार एकच असतो; मात्र त्याच्यावरगुन्हे वेगवेगळे असतात. सायबर गुन्हेगाराचा माग काढताना त्यामुळे अडचणी उद्‌भवतात.तपासाचे धागेदोरे परराज्यांत: सायबर गुन्ह्यांच्या सर्वच तपासाचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या  बाहेर असल्याचे समोर येते. यामुळे या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत दौरे करावे लागतात.

बंदोबस्ताची जबाबदारी अधिवेशनासारखे मोठे कार्यक्रम असो किंवा मोठ्या राजकीय व्यक्तीचे दौरे असल्यास किंवा त्यांचे कार्यक्रम असल्यास शहराबाहेरच्या वाढीव बंदोबस्ताचाही ताण सायबर पोलिसांना झेलावा लागतो.

 कोर्टाच्या वाऱ्या : अनेकदा ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षकाला आरोपपत्र व अनुषंगिक कामासाठी न्यायालयात जावे लागते. कधीकाळी नागपूर उच्च न्यायालयाच्या वाऱ्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात.

गरज किती कर्मचाऱ्यांची?

दोन लाखांवरील फसवणुकीबाबतच्या तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, अन्य सर्व तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. परिणामी, अधिक मनुष्यबळाची गरज आहे.सायबर ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी बहुतांश तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात नोंदविल्या जातात. अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. गुन्हे निखंदूत काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Labels: , , ,