Saturday, October 28, 2023

खोकल्याच्या सिरपचा नशेसाठी वापर, मोफत उपचारामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

 


अमरावतीः शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा मोफत झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खोकल्याच्या सिरपची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ७० टक्के रुग्ण हे फक्त खोकल्याची औषधी घेण्यासाठी येतात. त्यामुळे जवळपास महिन्याला रुग्णालयातून ५ हजारांच्या वर सिरपच्या बाटल्या लागत असल्याचे चित्र आहे.

शासकीय रुग्णालयात खोकल्याची सिरप मोफत मिळत असल्याने अनेकजण या सिरपचा वापर हा नशेसाठी करत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच औषधी दिली जाते. परंतु अनेक रुग्ण हे खोकला असल्याची खोटी माहिती देतात. त्यामुळे अनेक रुग्ण हा डॉक्टरांसमोरच खोकलून दाखवतो. आणि डॉक्टरांना औषधी लिहून देण्याची मागणी करतो. त्यामुळे रुग्ण जे सांगताहेत त्यावर नाईलाजाने विश्वास ठेवून सिरप लिहून देतात.