Tuesday, October 31, 2023

AMRAVATI | घरकुलांसाठी ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम

अमरावती: ग्रामपंचायतींची अनास्था, निधी वेळेवर न मिळणे, यादीतील घोळ यासह अनेक अडचणींमुळे सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे. जिल्ह्यात १६ हजार घरकुले अपूर्ण असून, या घरकुले बनविण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. घरकुलाची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे.


जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-२०२२ पर्यंत ९२ हजार ६३० घरकुलांचे टार्गेट दिले होते. लाभार्थ्यांना चार टप्प्यांत घरकुले बांधण्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. घरकुलांसाठी ग्रामपंचायतींच्या अंतर्गत जागासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींकडून लाभार्थ्यांना जागाच उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने घरकुलांचे कामच सुरू झालेले नाही.


Labels: , ,