Saturday, October 28, 2023

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा 0721-2552414 क्रमांक उपलब्ध....

बिबट वन्यप्राण्यापासून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तात्काळ संपर्कासाठी वनविभागाचा

0721-2552414 क्रमांक उपलब्ध....




अमरावती- शहरातील शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरात बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यावर वनविभाग, सतत लक्ष ठेवून आहेत. तसेच वनविभागांतर्गत कार्यरत असलेले शिकार प्रतिबंधक पथकाची चमु परिसरात सतत कार्यरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी व शिकार प्रतिबंधक पथक हे समन्वयाने बिबट या वन्यप्राण्याचे हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या ठिकाणी बिबट या वन्यप्राण्याचे अस्तित्व आहे. त्याठिकाणी नागरिकांनी एकत्र जमावाने येवू नये, तसेच त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चमुला आवश्यक ते सहकार्य करावे, रात्रीचे एकट्याने बाहेर फिरु नये, खोट्या अफवा पसरवू नये. जर कोणाला बिबट हा वन्यप्राण्याचे अस्तित्व दिसून आले तर, नियंत्रणकक्षाचा क्रमांक 0721-2552414 यावर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती वनविभगाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी केले आहे

Labels: