Monday, October 30, 2023

AMRAVATI | ICC CRICKET WORLD CUP 2023 क्रिकेट सामन्यावर लाखोंचा सट्टा, हिशेब करताना बुकी झाला जेरबंद जितेश आडतियाला अटक : Mobil Laptop जप्त करण्यात आले

अमरावती : भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या वर्ल्ड कप मॅचवर स्थानिक महेशनगर येथे लक्षावधी रुपयांचा सट्टा खेळवला गेला. पोलिस आयुक्तांच्या सीआययू पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान तो गोरखधंदा उघड झाला. रविवारी रात्री महेशनगर येथे झालेल्या या कारवाईदरम्यान जितेश रमनिकलाल आडतिया (५०, महेश नगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, पाच मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील ही पहिली कारवाई ठरली आहे

जप्त करण्यात आलेले साहित्य.

CIU पथक पेट्रोलिंग करीत असतांना महेशनगर येथे जितेश आडतिया हा स्वतःच्या घरून भारत विरुद्ध इंग्लंड या वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोबाइल फोन व लिंकच्या सहाय्याने बेटिंग घेऊन सट्टा खेळवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे तेथे धाड टाकली असता तो मोबाइलमधील गुगल क्रोममधील ओएसटीआयएन ७७७ या अॅपवर ऑनलाईन बेटिंग घेत असल्याचे दिसून आले. गैरकायदेशीर सॉफ्टवेअर बनवून ते लोकांना खरे आहे असे भासवून तो क्रिकेट मॅचवर फोन तसेच लॅपटॉपच्या सहाय्याने बेटिंग व हिशेब करताना मिळून आला. तसेच त्याच्या मोबाइलमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेऊन सट्टा खेळविल्याच्या रेकॉर्डिंग देखील दिसून आल्या.

विशाल थुनेजाकडे उतारा

आरोपी आडतिया याला अॅपबाबत विचारणा केली असता, खेळविल्या गेलेल्या बेटिंगचा उतारा आपण विशाल थुनेजा नामक व्यक्तीला देत असल्याची कबुली त्याने दिली. त्या व्यवहारामध्ये आपली भागीदारी असल्याचे देखील त्याने सांगितले. सठ्यांच्या हिशेबाची पाहणी केली •असता त्यात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.

रजिस्टरही जप्त

दोन अन्य मँचवर जे व्यवहार झालेत. ते लिहिलेले रजिस्टर, भारत विरुद्ध इंग्लंड मॅचदरम्यान व्यवहाराचे कागदे देखील जप्त करण्यात आली. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात क्रिमिनल इन्टेलिजन्स युनिटचे प्रमुख एपीआय महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, अंमलदार सुनील लासुरकर आदींनी ही कारवाई केली.


Labels: , , ,