Tuesday, October 31, 2023

AMRAVATI | निवृत्ती वेतन धारकांनी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावेत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : कोषागारामधून निवृत्तीवेतन स्वीकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या पेंशन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या निवृत्तीवेतनधारकांच्या ह्यात यादीवरच स्वाक्षरी करावी तसेच विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरावी. बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावे. निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ह्यात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2023 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. याबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे. 


Labels: , ,