Monday, October 30, 2023

नांदगाव खंडेश्वर येथील गांजा तस्करला अटक

 अमरावती (प्रतिनिधी) दि २९ : गांजा तस्करीत पसार असलेला हनुमान मोहिते हा गत १५ ते २० दिवसापासून राजापेठ ठाण्याच्या हद्दीत भाडयाच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून मलकापूर पोलीस शहरात पोहचले. राजापेठ पोलिसांच्या मदतीने रविवारी (ता. २९) दुपारी त्याला पकडून मलकापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर येथील हनुमान मोहिते । हा गांजा तस्कर असून अमरावतीसह अन्य जिल्ह्यात गांजा पोहचवितो. त्यासाठी तो वेगवेगळ्या युवकांना हाताशी धरून व पैशाचे आमिष देऊन त्यांच्या माध्यमातून विभागात गांजाची तस्करी करतो. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने बडनेरा ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यापूर्वी रवी मारोटकर याला पकडून त्याच्याकडून १०८,  किलो गांजा जप्त केला होता. बडनेरा पोलिसांनी  प्रकरणातील मारोटकर याचे साथीदार व मुख्य सुत्रधाराला  अद्याप अटक केलेली नाही. दरम्यान मलकापूर पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या एका  युवकाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने हनुमान मोहिते याचे  नाव पोलिसांना सांगितले. तेव्हापासून  मलकापूर पोलीस हनुमान मोहिते याच्या मागावर होते. तो गत १५ ते २० दिवसापासून । राजापेठ ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत  राहत असल्याची माहिती मलकापूर पोलिसांना  'मिळाली होती. त्यावरून मलकापूर पोलीस रविवारी  शहरात दाखल झाले. राजापेठ पोलिसांच्या मदतीने त्याचा दिवसभर शोध घेतला. दिल्ली पब्लिक स्कुल परिसरातून त्याला पकडण्यात आले.




Labels: , ,