Sunday, November 26, 2023

कुन्हा येथील 'त्या' बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस सुरूच आरोग्य विभाग पुन्हा पाठविणार चमू




करजगाव : तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील बोगस डॉक्टरच्या तक्रारीपश्चातही त्याची प्रॅक्टिस सुरूच असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. चांदूर बाजार तालुक्यात कुन्हा देशमुख येथे देबाशिष सिकंदर हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या २० वर्षांपासून मूळव्याधसह इतर आजारांवर उपचाराचा बनाव करीत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत कुठली जीवितहानी झाली नसली तरी या अज्ञानी व्यक्तीमुळे शक्यता केव्हाही खरी होऊ शकते. संबंधित व्यक्तीबाबत तक्रार केली असता, आरोग्य विभागाने कुन्हा देशमुख गाठले होते. त्यावेळी देबाशिषने पलायन केले होते. मात्र, तेव्हापासून आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे वळून पाहिले नाही. परिणामी बोगस डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात आहे. तालुका आरोग्य प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी स्थानिक नागरिकांनी आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली आहे.


आरोग्य विभागाची चमू गेली असता, तो बोगस डॉक्टर मिळाला नाही तसेच दवाखाना असल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. पुन्हा एकदा आरोग्य विभागाची चमू पाठवून पाहणी करणार आहे. बोगस डॉक्टर मिळाल्यास नक्की कारवाई केली जाईल.

डॉ. ज्योस्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार

Labels: , ,