Sunday, November 26, 2023

AMRAVATI POLICE | शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी जेरबंद

अमरावती/प्रतिनिधी:-शहरात घरफोडी करणारी तिघांची जोडी असलेल्या अट्टल चोरट्यांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.सदर आरोपींपासून शहरातील पाच गुन्हे उघड झाले असून चोरट्यांकडून तीन लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज पत्र परिषदेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली.
शंकर सुभाष बनसोड व ४२ वर्ष रा. भीम नगर अमरावती,परमेश्वर अशोक सुखदेवे व १९ रा. केडिया नगर अमरावती व पंकज राजू गोंडाने व २७ वर्ष रा.चौरे नगर अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तीनही अट्टल चोरट्यांची नावे आहे.सदर आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध ठाणे अंतर्गत येणार्‍या परिसरांमध्ये बंद घरांना निशाणा बनवून घरफोडी करीत होते.अशातच त्यांनी दिवाळीच्या वेळी सुद्धा घरफोडी केली.गुप्त माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अतिशय मेहनतीने या तीनही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.
चोरट्यांनी शहरातील राजापेठ मध्ये तीन बडनेरा मध्ये एक व नांदगाव पेठ मध्ये एक झालेल्या घरफोडीचे गुन्हे कबूल केले आहे तर आतापर्यंत तीनही आरोपींनी शहरातील तब्बल १५ घरफोडी केल्या आहेत.आरोपींमधून शंकर बनसोड व पंकज गोंडणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून परमेश्वर सुखदिवे याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यात आरोपी पंकज गुंडाणे हा ११ ऑक्टोंबर रोजी नागपूर जेलमधून सुटला तेव्हापासून तो सतत अमरावती शहर,अमरावती ग्रामीण, तसेच नागपूर शहरात चोरी घरफोडीचे गुन्हे करत आहे.सदर आरोपी हा पोलीस कोठडी मध्ये असून त्याच्याकडून अन्य माहिती घेणे सुरू आहे.आरोपींपासून आणखी दहा ते पंधरा अधिक गुन्हे उघडकीस येऊन मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी दर्शविली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी,पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, प्रभारी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, गंगाधर जाधव, छोटेलाल यादव,सागर सरदार, निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, शेख वकील यांनी केली.

Labels: , ,