Thursday, November 23, 2023

अमरावती ग्रामीण एसपींचा मंत्र - 'बेसिक पोलिसिंग'



अमरावती : प्रत्येकाला समाजात निर्भय वाटावे, अशारितीने कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जाईल. त्यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, अशी ग्वाही नवनियुक्त पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. बुधवारी दुपारी त्यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.विशाल आनंद यांना ग्रामीण पोलिसांनी सलामी दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'बेसिक पोलिसिंग'वर आपला भर राहील. त्यापुढे जाऊन युनिटी पोलिसिंग अंगीकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथील विशेष कृती गट, नक्षलविरोधी अभियानाचे अधीक्षक विशाल आनंद यांची अमरावती एसपी म्हणून बदली झाली. त्यानुसार ते बुधवारी येथे रूजू झाले. त्यांनी बंदची माहिती जाणून घेतली तथा शांततेचे आवाहन केले. अंतर्गत नियुक्ती ही मेरिटवर असेल. बेसिक प्रोफेशनल पोलिसिंग कसे करायचे, याकडे लक्ष दिले जाईल, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह पोलिसांच्या कल्याणाकडेही लक्ष दिले जाईल, असे एसपी विशाल आनंद म्हणाले.


सोशल मीडिया चॅलेंजिंग

अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणारे गुन्हे व शेअर फॉरवर्ड पोस्ट पोलिसांसाठी चॅलेंज झाले आहे. आक्षेपार्ह वा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टचे आयडेंटिफिकेशन, सोशल व्हायरलला अटकाव व जनजागृती अशा 'थ्री स्टेप अप्रोच'ने आपण त्याला अटकाव घालण्याचा प्रयत्न करू, असे एसपी म्हणाले.


सन २०१४ च्या बॅचचे आयपीएस असलेले विशाल आनंद सिंगुरी यांनी गतवर्षी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यकाळ गाजवला. यंदाच्या ३० ऑगस्टला त्यांची नागपूर येथील विशेष कृती गट, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती.


Labels: , ,