Friday, December 8, 2023

BHATKULI | भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे जनतेची लूटमार शासकीय पावती शुल्क भरण्याची व्यवस्था बाहेरील व्यक्तींना

अमरावतीउपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जनतेची दिशाभूल करून त्यांची लुटमार सुरू आहे.कार्यालयात जनता नक्कल, काढण्याकरिता येतात.त्या नकलेचा अर्ज आपल्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या झेरॉक्स सेंटर वर हा 30/50 रू.मिळतात.जनतेने तो अर्ज भरल्या नंतर त्यांना तो अर्ज घेऊन कार्यालयात शुल्क भरण्याच्या विभागात जमा करण्याकरिता जावे लागते.परतू वस्तुस्थिती अशी आहे की शुल्क भरण्याचे आणि अर्ज जमा करण्याचे कक्ष कार्यालयात नाही आहे ते कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या समोर खाजगी व्यक्ती हे काम सांभाळतो असे कार्यालयातील कर्मचारी वर्गा कडून सांगण्यात येते की आपण बाहेर जाऊन अर्ज जमा करा आणि त्याला पैसे देऊन द्या.काही नकला काढण्याकरिता 150 रू.जनते कडून घेण्यात येतात परतू त्याबाबत शुल्क पावती मिळत नाही, त्याठिकाणी कर्मचारी यांना विचारपूस केली असता शुल्क भरण्याचे कक्ष हे बाहेर आहे त्यांना पैसे देऊन द्या ते तुम्हाला आणून देतील. असे सांगण्यात येते शुल्क भरण्याची पावती च उल्लेख केला असता आपण पावती देत नाही अस कर्मचारी आणि सबंधित बाहेरील व्यक्तीने सागितले म्हणून ही बाब अतिशय निंदनीय असून उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे जनतेची दिशाभूल करून त्यांची मोठ्या प्रमाणात लुटमार केली जाते.प्रत्येक कार्यालयात अर्ज जमा करण्याचे आणि शुल्क पावती भरण्याचे कक्ष स्वतंत्र असते.परतू भूमी अभिलेख कार्यालय भातकुली हे असे एकमेव कार्यालय आहे की ज्या ठिकाणी अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी खाजगी व्यक्ती कडे जावे लागते.विशेष बाब म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या पाठीमागे अतिशय जवळच असून त्यावर जिल्हाधिकारी यांचे देखील लक्ष नाही, या कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर गोर गरीब शेतकरी जनतेची दिशाभूल करून त्यांची लुटमार केली जाते ते तात्काळ थांबवण्यात यावी व नियमानुसार शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात यावी.तसेच या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेन्याची मागणी नगरसेवक सतीश आठवले यांनी केली आहे.

अर्ज,शुल्क जमा करण्याचे कक्ष आपल्या कार्यालयात सुरू करून नियमानुसार शुल्क घेण्यात यावे.आणि रीतसर शुल्क भरण्याची पावती सबंधित व्यक्तींना देण्यात यावे.तसेच बाहेरील व्यक्तींना अर्ज जमा करून शुल्क भरण्याकरिता ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले त्या कर्मचारी,अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, सदर निवेदनावर तात्काळ अंबलबजावणी करण्यात यावी, अन्यथा कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.
श्री.सतीश शंकरराव आठवले
नगरसेवक भाजपा भातकुली