Monday, December 11, 2023

AMRAVATI CITY NEWS | भारत-जर्मनी संयुक्त विद्यमाने नागपुर येथे आतंराष्ट्रीय आर्ट चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे श्री आर्ट कला वर्ग करणार भारताचे प्रतिनिधीत्व

आर्ट बुक दे प्लॅटफार्म यांच्या आयोजित जर्मनी व भारतातील चित्रकाराचे नागपूर येथील दर्डा आर्ट गॅलरी लोकमत चौक येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे माझी खासदार अनंत गुढे सर व वीरशैव समाजातील श्री कैलास गिरलोरकर व नागपूर शहरातील श्री दिलीप कोचे  सर, वीरशैव समाजातील भुषण श्री प्रवीण चाकोते सर ,सौ.तृप्ती काळे,आर्ट बुक दे प्लॅटफार्म फाऊन्डर सौ.अनुराधा निंबाळकर, महाराष्ट्रतील एक नंबरचे कलावर्गाचे संचालक प्रा सारंग नागठाणे यांच्या हस्ते झाले  विशेष म्हणजे अमरावतीच्या वैभवाला कलेची जाेड देणारे श्री आर्ट कला वर्गातील १७विद्यार्थाचे ८० चित्रांची येथे निवड झाली आहे श्री आर्ट कला वर्ग हे आज कला-रसिकांचा मानबिंदू ठरले आहे. त्यामध्ये सो.अलका सिंघई,सौ.अस्मिता सिंगणारे,सौ.पुजा डहाके,सौ.जोस्ना हंसोरीया ,सौ.अंकिता किनेकर, कु.मुक्ता वाघ,कु.मेघा धवन,कु.क्षितिजा बारोटकर,कु.रिया धमाके,कु.रिध्दी चौधरी,कु.ज्ञानेश्वरी चोपडे,कु,अक्षरा मारोडकर ,प्रा.सारंग नागठाणे, श्री सागर शिरसुध्दे ,चि.जय ठाकरे,चि.स्वरूप बोरकर,चि.उत्कर्ष वानखडे,चि. इशान काथवटे या कलाकारांच्या चित्राचे प्रदर्शन भरविले आहे यांच्या सोबत सहा जर्मनी येथील चित्रकारांच्या चित्रांचे सुध्दा या प्रदर्शनात समावेश आहे त्यामध्ये जर्मनी चे प्रसिद्ध चित्रकार Artist omi Riesterer sir, Artist Barbara jager , Artist Nicole Blaffert, Artist Agueda Rubio Munoz (Spain), Artist Karina keddi,या जर्मनी कलाकारांचा समावेश आहे श्री आर्ट कलावर्गातुन माेठ्यांप्रमाणात अनेक कलाकार आज राष्ट्रीय, आतंराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा लाैकीक साकार करीत आहे ते श्री आर्ट कला वर्ग मुळेच. संचालक प्रा. सारंग नागठाणे यांनी जाेपासलेली कलेची आराधाना आज फलीत हाेत असून येथील कलावंत विद्यार्थी कला क्षेत्रात भारताचे प्रतिधित्व करण्यास सक्षम झाले आहेत. ही उपलब्धी समस्त अमरावतीकरांना गाैरान्वीत करणारी आहे असे माझी खासदार श्री अनंत गुढे सर यांनी म्हटले आहे 
जर्मनी येथील आर्टबुक प्लॅटाॅर्म यांच्या संयुक्त विद्यामाने दि.९ ते ११  डिसेंबर २०२३ दरम्यान दर्डा आर्ट गॅलरी,* *लाेकमत चाैक नागपुर येथे आतंराष्ट्रीय कला प्रदर्शनीचे आयाेजन करण्यात आले आहे. तसेच यापुर्वी दुबई, काठमांडू (नेपाळ) दिल्ली, मुंबई, नागपुर, काेलकाेता, वडाेदरा, राजस्थान, काेटा, उज्जैन, अकाेला येथील आर्ट एक्झ्रीबिशन मध्ये श्री आर्ट कला वर्ग च्या ४० कलावंतांच्या कलाकृतींची भुरड कला-रसिकांना पडली आहे.कला उपासक, समर्पित ध्येयवेडा प्रा. सारंग नागठाने यांनी अमरावतीच्या कला क्षेत्राला दिलेली भरारी आज साता समुद्रा पलिकडे गेली असून याची दखल जर्मनी येथील डाॅ. मनाेज निंबाळकर व सो.अनुराधा निंबाळकर यांनी घेत नागपुर येथे इंरटनॅशनल आर्ट एक्झीबिशन चे आयाेजन करण्यात केले आहे पाहता क्षणीच माेहित होणाऱ्या श्री आर्ट कला वर्गच्या कलाकृती या प्रदर्शनीमध्ये* *कला-रसिकांना भुरळ पाडतात असा विश्वास कला क्षेत्रातून व्यक्त करण्यात होत आहे श्री आर्ट कला वर्गाला अमरावती चे आयुक्त श्री सौरभ कटीयार सर  ,व अमरावती चे पोलिस कमिशनर श्री नवीनचंद्र रेड्डी सर ,सौ.अंजली देशमुख मॅडम, श्री क्षिजीत मिटकरी, देवानंद ठोसरे, यांनी कलावर्गाचे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आपण सर्वांनी या कला प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे आणि येणार्या नवीन वर्षामध्ये अमरावतीमध्ये सुध्या यांचे प्रदर्शन होणार आहे
................